पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले अनुदान अत्यंत तोकडे ; शासनाने पूरग्रस्तांची चेष्टा केली भाजप किसान मोर्चाच्या वतीने करवीर तहसीलदारांना दिले निवेदन

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
महाराष्ट्र राज्य शासनाने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेले सानुग्रह अनुदान अत्यंत तोकडे असून किमान 2019 सालच्या निष्कर्षाप्रमाणे शेती व इतर सर्व घटकांना मिळणे आवश्यक आहे. मात्र यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी व इतर अनेक मंत्र्यांनी दिलेला शब्द पाळलेला नाही. याचीच जाणीव करून देण्यासाठी आज भाजप किसान मोर्चाच्या वतीने करवीर तहसीलदार यांना यासंबंधी निवेदन दिले. खराब झालेले पीक सुद्धा शेतातून बाहेर काढता येणार नाही इतकी तुटपुंजी मदत करून शासनाने पूरग्रस्तांची चेष्टा केली आहे. तरी दिलेला शब्द पाळून शासनाने तातडीने वाढीव मदत द्यावी अन्यथा आंदोलन उभारू असा इशारा यावेळी भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला.
यावेळी भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे,मा. आ. अमल महाडिक,विठ्ठल पाटील, हंबीरराव पाटील, महेश मोरे, दादासो देसाई, आनंद गुरव, दत्तात्रय शिंदे, कृष्णात भोसले, राहुल दळवी, संजय काटकर, रामचंद्र देशमुख, अजिंक्य माळी, आनंद पाटील, दत्तात्रय मेडशिंगे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.