कडलगे बुद्रुक येथील जवान जयवंत पाटील यांचा भव्य सत्कार.

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
कडलगे बुद्रुक तालुका चंदगड येथील जवान जयवंत लक्ष्मण पाटील यांची भारतीय सैन्य दलात पदोन्नती झालेने त्यांचा सपत्नीक ग्रामस्थ,विविध मंडळ,प्राथमिक शाळा,आजी माजी सैनिक संघटना,बचतगट,यांच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम पार पडला. त्यानिमित्त ऑर्डनरी लेफ्टनंट जय वंत पाटील यांचा अल्प परिचय श्री पाटील हे सैन्यदलात 1992 साली बेळगाव मराठा लाईट इनफन्ट्री ला भरती झाले व तिथेच त्यांचे प्रशिक्षण हि पार पडले.
यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग फेब्रुवारी 1993 ला दार्जिलिंग येथील 7 मराठा ला झाली,यानंतर सप्टेंबर 1998 ला व मे 2001 ला पोर्ट ब्लेअर,सप्टेंबर 2000 ला 17 आर आर,ऑक्टोम्बर 2003 व जानेवारी 2010 ला उरी सेक्टर,एप्रिल 2013 गांधीनगर गुजरात,ऑगस्ट 2015 अरुणाचल प्रदेश,फेब्रुवारी 2018 ला सुरतगढ,नोव्हेंबर 2020 नौशेरा,तर 3 नोव्हेंबर 2020 ते अजपर्यंत नवी दिल्ली आदी ठिकाणी त्यांनी उत्कृष्ट अशी सैन्य सेवा बजावली असून नवी दिल्ली येथे शांती सेनेसाठी सुद्धा त्यांचा सहभाग होता त्यांची आतापर्यत 30 वर्ष इतकी सेवा झाली असून उत्कृष्ठ सेवेबद्दल सैन्य दलाच्या वतीने त्यांना मेडल्स मिळाली असून त्यांचा सत्कारही झाला आहे.
ग्रामस्थांच्या वतीने ढोलगरवाडी फाटा ते गावापर्यंत सजविलेल्या वाहनातून संगीत वाद्यांच्या गजरात व मलतवाडी येथील लेझीम पथकाच्या तालावर त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिला मंडळ,व मुलींनी आकर्षक अशी संपूर्ण गावभर रांगोळी रेखाटली होती सरपंच सुधाकर गिरी यांच्या हस्ते त्यांचासत्कार झाला यावेळी ऑर्डनरी लेफ्टनंट जयवंत पाटील म्हणाले तरुणांनी आपल्या अंगातील सुप्त कला गुणांना वाव देऊन आपल्या जीवनात प्रगती साधावी आपण स्वतःला कधीही कमी लेखू नये प्रयत्नांची कास धरा यश तुमच्याकडे धावत येईल असे सांगितले.
तुमच्या यशाने गावचे हि नाव लौकिक होईल त्यांचे वडील लक्ष्मण पाटील हे गावातील पहिले सैनिक होत स्वागत प्राथमिक शाळेच्या मुलांनी स्वागत गीतांनी केले.
प्रास्ताविक विलास पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश पाटील यांनी केले. आभार नरेंद्र हिशेबकर यांनी मानले. त्यांच्या या जीवन प्रवासात आई सौ लक्ष्मी,वडील माजी सैनिक लक्ष्मण,पत्नी सौ इंदूबाई,मुली सौ सोनाली दिनेश ओवूळकर,कु अनुजा,कु अनुशा या सर्वांचे योगदान लाभल्याचे त्यांनी सांगितले.