ताज्या बातम्यामनोरंजन

वारकरी समाजाच्या उन्नतीकरिता शासनाने वारकरी संप्रदायाचे प्रश्न सोडवावेत  : प्रसिद्ध प्रवचनकार धनाजी पाटील यांचे प्रतिपादन   

सावरवाडी प्रतिनिधी :

कोरोना महामारीमुळे वारकरी  संप्रदायाची प्रचंड हानी झाली आहे . आदर्श समाजाच्या जडणघडणेत वारकरी संप्रदायाचे योगदान सर्वश्रेष्ठ आहे . वारकरी समाजाच्या उन्नतीकरिता राज्य शासनाने वारकरी संप्रदायातील प्रश्न सोडवावेत . असे प्रतिपादन अखिल भारतीय वारकरी मंडळाचे करवीर तालुकाध्यक्ष व प्रसिद्ध प्रवचनकार धनाजी पाटील यांनी केले 

करवीर तालुक्यातील भाटणवाडी येथे सोशल डिस्टन्सचे नियम पाळून  अखिल भारतीय वारकरी मंडळ तर्फ आयोजित वारकरी मेळाव्यात  पाटील बोलत होते . मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी  जिल्हाध्यक्ष यशवंत पाटील होते

यावेळी अध्यक्षस्थानावरून  मार्गदर्शन करतांना जिल्हा अध्यक्ष . यशवंत पाटील म्हणाले ग्रामीण भागातील वारकरी संघटीत झाला पाहिजे . शासनाच्या विविध योजनांचा लाभ वारकरी कलाकार ,यांना होणे गरजेचे आहे . वारकरी संघटनाद्वारे विधायक कामे करणे गरजेचे आहे , कोल्हापूरात हक्काचे वारकरी भवन उभारण्यासाठी संघटीत ताकद उभी केली पाहिजे . 

कार्यक्रमात किल्लेदार महाराज , सरपंच अमित कांबळे सुतार महाराज मंगल वरुटे, माजी सरपंच वसंतराव पाटील , प्रकाश पाटील , सरदार पाटील , वंदना पाटील, जयश्री खरोशे , पत्रकार विश्वनाथ मोरे , तुकाराम पाटील , आदिची भाषणे झाली . यावेळी वारकरी स्त्री पुरुष उपस्थितीत होते . 

कोल्हापूर शहरात वारकरी भवन उभारू 

 कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या साठी कोल्हापूर शहरात निवाऱ्यासाठी भव्य वारकरी भवन उभारुन वारकऱ्यांची सोय करण्याचा मनोदय मेळाव्यात व्यक्त होताच उपस्थितांनी टाळ वाजवून दाद दिली .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks