राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना दिला अल्टिमेटम ! 24 तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा……..

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी आठ दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशी तसेच एसटी महामंडळाचेही नुकसान होत आहेत. सरकार व एसटी संघटना यांच्यात अनेक वेळा चर्चा झाली, पण संप मागे घेण्यात आलेला नाही. आता राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांनी अल्टिमेटम दिला आहे. एसटी महामंडळांच्या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारन नोटिस बजावली आहे.
राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडित काढण्यासाठी विविध पर्याय शोधत आहे. त्यानुसार आता कारवाईचा बडगा सरकारनं उगारला आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या तीनशे ते साडेतीनशे कामगारांना एसटी महामंडळाने सेवा समाप्तीची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ”24 तासांत कामावर हजर व्हावं, अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असं या नोटीशीत नमूद केलं आहे.
एसटी महामंडळात सुमारे 1200 ते 1500 जण हे रोजंदारीवर काम करीत आहेत. ”या कामगारांनी कामावर यायला हवं अशी आमची अपेक्षा आहे, पण तेही संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना नोटीस पाठवणार आहोत. उद्या ते कामावर येतात की नाही पाहिले जाईल. अन्यथा, पुढे काय कारवाई करायची तो निर्णय घेतला जाईल,” असे परिवहनमंत्री अनिल परब म्हणाले.