ताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ.विलासराव नांदवडेकर यांचेकडून नेसरी वाचन मंदिरास सदिच्छा भेट

नेसरी :पुंडलिक सुतार

दिवाळी पाडव्याचे औचीत्य साधून शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलासराव नांदवडेकर यांनी नेसरी वाचन मंदिरास सदिच्छा भेट दिली, यावेळी ग्रंथालयाच्या कामकाजाची प्रशंसा केली. तसेच नियोजित ‘शहीद मेजर सत्यजित अजितसिंह शिंदे (नेसरीकर) स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या कामकाजा संबंधाने मार्गदर्शक सूचना दिल्या. त्याचबरोबर स्वत:डॉ. नांदवडेकर यांनी दुर्मिळ व मौल्यवान अशी २०० पुस्तके ग्रंथालयास ग्रंथ-भेट दिली. कार्यवाह वसंत पाटील यानीं ग्रंथ-भेट स्विकारली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ.सत्यजित देसाई, आप्पासाहेब कुंभार सेवानिवृत्त कर्मचारी विचार मंच चे उपाध्यक्ष मारुतीराव रेडेकर, गोविंदराव नांदवडेकर, उद्योजक शिवाजीराव पाटील, वैशाली व दिलीप नारायण पाटील,कु.आस्था विलासराव नांदवडेकर इ. मंडळी उपस्थित होती डॉ.विलासराव नांदवडेकर यांनी आज भाऊबीजेच्या शुभ दिनी दिलेली ही अमोल ग्रंथ-भेट ग्रंथालयाच्या दर्जा बदलाची नांदीच आहे, असे मला वाटते.,२०२३ मध्ये आपले ग्रंथालय’अ ‘ दर्जा प्राप्त होईल. त्यासाठी डॉ. नांदवडेकर यांचे आम्ही ऋणी आहोत. त्यांच्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे. ते आमचे मार्गदर्शक राहतील, याची खात्री आहे. त्यानंतर संचालक डॉ. सत्यजित देसाई यांनी छोटीसी भेट देऊन आभार मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks