ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांची कोल्हापूर येथे सदिच्छा भेट

कोल्हापूर :
कसबा बावडा येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या प्रांगणात कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील व जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील यांची विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदिच्छा भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या संदर्भात विविध विषयावर चर्चा झाली.
भेटीप्रसंगी मदनदादा पाटील, माजी सरपंच संदीप पाटील, उपसरपंच सुरेंद्र धोंगडे, पांडुरंग हळदकर(सर), सुनील भारमल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.