ताज्या बातम्यामहाराष्ट्र

“Good touch Bad touch” : कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व साई इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर यांचा संयुक्तिक कार्यक्रम.

कोल्हापूर :

कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणा व साई इंग्लिश मिडीयम स्कूल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने “Good touch Bad touch” दि.१०/०२/२०२२ रोजी कोल्हापूर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्रीमती व्ही. व्हि.जोशी यांचे मार्गदर्शनाखाली तसेच मा.पंकज देशपांडे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचे सूचनेनुसार “Good touch Bad touch व The Maharashtra Right to Public Services Act, 2015 या कार्यक्रमाचे दि.१०/०२/२०२२ रोजी साई इंग्लिश मिडीयम स्कूल जरग नगर येथे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी सूत्रसंचालन शिक्षिका श्रीमती.स्मिता पेटकर यांनी केले.आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे पॅनल ॲड. बी. एम.पाटील सर यांनी केले.तसेच विधी स्वयं सेवक अनुजा खुरदळ यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ आणि त्यामधील तरतुदी व मुलींनी घ्यावयाची काळजी तसेच चांगला स्पर्श वाईट स्पर्श यावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या विधी स्वयं.सेवक फ्रान्सिस्को डिसोझा यांनी मानले.या कार्यक्रमाचा लाभ १०० विद्यार्थ्यानी घेतला. घेतला.साई इंग्लिश मिडीयम स्कूलचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks