ताज्या बातम्यामहाराष्ट्र

बिबट्या वाघाची शिकार करून घरी नखे व मांस बाळगल्या प्रकरणी शिवडाव येथील वसंत महादेव वास्कर याच्यावर वन गुन्हा नोंद.

गारगोटी विशेष प्रतिनिधी : सुभाष माने 

भुदरगड तालुक्यातील वन विभाग कडगांव यांच्या कार्यक्षेत्रात,वंन्यजीव विभागाच्या सातारा जिल्ह्याच्या फिरत्या पथकाने आज ३ सप्टेंबर२०२१ रोजीच्या दुपारी १२ वाजताच्या केलेल्या धडक कारवाईत बिबट्या वाघाची शिकार करून घरी ३ नखे व वंन्य प्राण्याचे ७२० ग्रँम चे काळीज, शिकारीची बंदूक काडतूसे बाळगल्याप्रकरणी शिवडाव ता भुदरगड जि कोल्हापूर येथील वसंत महादेव वास्कर वय वर्षे ६२ या माजी पोलीस पाटील यास अटक करण्यात आली आहे. वनक्षेत्रपाल कडगांव कार्यालयात या गु्न्ह्याबाबत या कारवाईचा गुंन्हा रितसर नोंद करण्यात आला .सदर बिबट्या वाघाच्या शरिराचे सापडलेले सर्व भाग व स्वत: आरोपी याला त्याच्या शिवडाव येथील राहात्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे.सदर आरोपी वसंत महादेव वास्कर याच्यावर भारतीय वंन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ अंतर्गत वन गुंन्हा नोंद करण्यात आला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे मुख्य वन संरक्षक डॉ व्हि क्लेमेंट बेन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे, फिरत्या पथकाचे वनक्षेत्रपाल युवराज पाटील, सातारा चे मानद वंन्यजीव रक्षक तथा वंन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो सदस्य रोहन भाटे, सांगलीचे मानद वंन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील, वन विभागाचे वनपाल, वनरक्षक आदिंच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक वनसंरक्षक नवनाथ कांबळे हे करत आहेत.या कारवाईत कडगाव चे नुतन वनक्षेत्रपाल अशोक वाडे, गारगोटीचे वनक्षेत्रपाल किशोर आहेर, वनपाल संदिप शिंदे, वनरक्षक जॉन्सन डीसोजा, सागर पटकारे, सागर यादव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदिप भोसले व इतर कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला.

वन विभागाच्या गोपनीय सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर आरोपी वसंत महादेव वास्कर याने या वंन्यप्राण्यांचे काळीज घरातील फ्रीजमध्ये लपवून ठेवले होते. घराच्या स्वयपाकातील हळदीच्या डब्यात तीन नख्या लपवून ठेवल्या होत्या.यातील दोन नख्या त्याने एकास विकल्याची माहिती या पथकाला मिळाली आहे.घरात एक बंदुकही आढळून आली तीही ताब्यात घेण्यात आली आहे. सदर आरोपी वसंत महादेव वास्कर याने असे अनेक कारनामे जंगलात स्वत:कडे असलेल्या एक जीप व बंदुक घेवून केले असल्याची माहिती वन विभागाला मिळाली आहे.मिळालेल्या गुप्त माहितीवरून गेले दोन दिवस या छापा सत्राचे नियोजन सुरु होते असे समजते. नियोजनबध्द सापळा रचून हा छापा मारण्यात आला आहे.सदर आरोपीस भुदरगड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

या कारवाईने संपुर्ण कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून चोरटी शिकार करणारे सावध झाले आहेत तर निसर्गमित्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks