ताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गोकुळ दुध संघातर्फे दुधउत्पादकांना न्याय मिळवून देणार : विश्वास पाटील

सावरवाडी प्रतिनिधी :

कोल्हापुर दुध उत्पादक संघ च्या दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळून देण्यासाठी कटिबद्ध आहे . २० लाख लिटर दुध संकलन करण्यासाठी दुध उत्पादकांनी दुध व्यवसाय वाढवावा असे प्रतिपादन  गोकूळ दुध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांनी केले.

करवीर तालुक्यातील  बीडशेड येथे गोकूळ दुध संघामार्फत आयोजित करवीर तालुका दुध उत्पादक शेतक यांच्या मेळाव्याच्या  अध्यक्षस्थानावरून विश्वास पाटील बोलत होते .  दुधउत्पादक शेत क- यांना म्है श खरेदीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून अर्थसाह्य करण्यात येत असल्याचे पाटील यांनी सांगितले .मेळाव्यात बोलतांना माजी खासदार निवेदिता माने म्हणाल्या गोकूळ दुध संघ व जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतक-यांना न्याय देण्यात येत आहे . . यावेळी बोलतांना जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने म्हणाले गोकूळ दुध संघ व जिल्हा बँक या दोन संस्थेद्वारे विकासाचे पर्व उभारले जात आहे. 

मेळाव्यात जिल्हा बँकेचे संचालक आशिफ फरास , गोकूळ दुध संघाचे संचालक बाळासाहेब खाडे , अजित नरके, के वाय पाटील, जिल्हा बॅकेचे कर्मचारी पी वाय कुंभार, दुध संघाचे डॉ उदय मोगले , आदिची भाषणे झाली . स्वागत प्रास्ताविक बाळासाहेब खाडे यांनी केले शेवटी गोकूळचे संचालक शशिकांत पाटील यांनी आभार मानले. 

मेळाव्यास गोकूळचे संचालक बाबासाहेब चौगले , एस आर पाटील ,जिल्हा परिषेदेचे सदस्य युवराज पाटील राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते राजू लाटकर ,

कॉग्रेसचे नेते शामराव सुर्यवंशी , गोकूळचे माजी संचालक सत्यजीत पाटील , करवीर चे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, कुंभीचे संचालक दादु लाड, वीरशैव बँकेचे अध्यक्ष अनिल सोलापूरे यांच्यासह दुध संस्थेंचे पदाधिकारी उपस्थितीत होते.

आबाजीच्या मार्गदर्शनाने गोकूळ बहरला ! 

गोकूळ दुध संघाच्या विकासात्मक वाटचालीत दुध उत्पादनाना न्याय  मिळवून दिला .गोकूळच्या विकासात विश्वासराव पाटील ( आबाजी ) यांचे योगदान समाजाभिमुख आहे अशी प्रतिक्रिया दुध उत्पादक शेतकऱ्यांनी कार्यक्रम स्थळी व्यक्त केली .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks