काटकसर करून गोकूळ दुध संघ दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार : विश्वासराव पाटील यांचे प्रतिपादन

सावरवाडी प्रतिनिधी :
गोकूळ दुध संघामुळे शेतकऱ्यांचा संसार फुलला आहे .गोकूळ दुधसंघात मोठ्या प्रमाणात काटकसर करून जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार आहे आहे प्रतिपादन गोकूळ सहकारी दुध संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील यांनी केले
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथे करवीर पश्चिम भागातील ४० गावांच्या दुध संस्थेतर्फ दुधाला दोन रुपये दर दिल्याबद्दल गोकूळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या आयोजित सत्कार प्रसंगी पाटील बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नंदकुमार पाटील होते .
गोकूळमध्ये नव्या सत्ताबदलामुळे सर्व बाबीत काटकसर करून शेतकऱ्याना जादा दर कसा देण्यात येईल हा विचार पालकमंत्री सतेज पाटील व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे सांगून विश्वासराव पाटील म्हणाले म्हैशीच्या दुधात वाढ होणे आवश्यक आहे भविष्यात वीस लाख लिटर दुध संकलन करण्याचा गोकूळ चा मानस आहे . त्यासाठी दुध संस्थांनी पुढाकार घ्यावा
कार्यक्रमात सर्वश्री कवी अनिल बचा टे , वैभव कांबळे , विनायक देसाई , भानूदास पाटील , नंदकुमार पाटील आदिची भाषणे झाली . प्रारंभी दुध संस्थातर्फ भगवान दिडे यांच्या हस्ते गोकूळचे चेअरमन विश्वासराव पाटील यांचा गौरव करण्यात आला . वीरशैव बँकेचे चेअरमन अनिल सोलापूरे यांनी स्वागत केले . शेवटी एस डी जरग यांनी आभार मानले
यावेळी तुकाराम पाटील , महादेव माळी , गोकूळ दुध संघाचे जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील , बलभिम सेवा संस्थेचे चेअरमन राहूल पाटील शाहू दुध संस्थेचे चेअरमन सचिन पाटील , माधव पाटील ,संजय पाटील , सुनिल पाटील , यांच्यासह ४० दुध संस्थेचे पदाधिकारी उपस्थितीत होते
एका कवितेने उपस्थितीत घायाळ !
दुध संस्थेच्या वतीने गोकूळचे नुतन चेअरमन विश्वासराव पाटील आबाजी यांच्या कार्याची आठवण एका नवोदित कवीने कविता सादर केली तेव्हा उपस्थिती पदाधिकारी घायाळ होऊन टाळ्याचा कडकडाट उडाला .