गोकुळ दूध संघाने जातिवंत म्हैस खरेदीसाठी ३५ हजारांचे अनुदान द्यावे : प्रा. हिंदुराव पाटील यांची मागणी.

कूर :
कोनवडे,ता.भुदरगड येथील प्रा.हिंदुराव पाटील (H.R.) प्रणित जयहिंद सहकार समूह येथे आज गोकुळ चे संचालक रणजितदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.यावेळी त्यांनी सहकार समूहाच्या नेटक्या व्यवस्थापन व दुध उत्पादकांच्या कष्टाचे कौतुक केले.जयहिंद सहकार समूहाने सभासदांच्यात विश्वासार्हता निर्माण करून नावलौकिक कमावल्याचे प्रतिप्रादन रणजितसिंह पाटील यांनी केले .जयहिंद विकास सेवा संस्थेचा सातत्याने ऑडीट मध्ये असणारा अ वर्ग व स्थापनेपासून असणारी सभासदपातळीवर १०० % कर्जवसुली तसेच दूध संस्थांचा उच्चांकी बोनस, सभासद पाल्यांचा गुणगौरव या सर्व गोष्टी उल्लेखणीय असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले .
याप्रसंगी समूहाचे प्रणेते प्रा.एच.आर.पाटील यांनी २५ हजार रुपयांऐवजी ३५ हजार रुपये इतके अनुदान द्यावे या केलेल्या मागणीचे स्वागतार्ह कौतुक करत बोर्ड मीटिंग मध्ये नक्कीच हा विषय मांडण्यात येईल याची ग्वाही देण्यात आली.याप्रसंगी रणजितदादा पाटील यांचा सत्कार कृषी अधिकारी पी.आय. पाटील यांचे हस्ते करणेत आला.
यावेळी बिद्री साखरचे संचालक व मौनी विद्यापीठ गारगोटीचे माजी चेअरमन मा.मधुकर (आप्पा) देसाई, माजी सभापती बापूसो आरडे,धनाजीराव शिंदे,आनंदराव लोकरे,डी डी पाटील सर,दीपक लोकरे,वाय .के . पाटील सर,पी . के . सर,महादेव पाटील, एस .एल.शिंदे, तानाजी पाटील ,तात्यासो शिंदे, दिनकर पाटील ,तुकाराम पाटील ,रामचंद्र पाटील, शाहू भोसले,एकनाथ पाटील,प्रशांत शिंदे,टी .आर . पाटील, रघुनाथ पाटील ,पंढरीनाथ पाटील,बाळासो गुरव, संभाजी राजिगरे, सुनिल गुरव, सुनील पाटील,संजय पाटील,प्रथमेश चव्हाण, दिपक पाटील, अजिंक्य पाटील, स्वप्निल पाटील, संकेत पाटील आदींसह समूहातील सर्व संस्थांचे चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.