वडिलांचे स्मृतिप्रीत्यर्थ एक लाख रुपये ची पुस्तके भेट; काळोखे परिवाराचा स्तुत्य उपक्रम

वडणगे-निगवे दु :
श्री ज्योतिर्लिंग विध्यामंदिर, वडणगे-निगवे दुमाला येथे, शैक्षणिक उपक्रम पार पडला औचित्य होते कै किसन काशिनाथ काळोखे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे चिरंजीव श्री अमृतराव किसन काळोखे राहणार -बुध जिल्हा सातारा यांनी इतर खर्चाला फाटा देऊन रुपये एक लाख ची स्कॉलरशिप, बुद्धिमत्ता ,व्याकरण अशी एक लाख रुपयाची सहाशे पुस्तके विद्यालयातील विद्यार्थ्यांकरता भेट दिली.
या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे धर्मदाय सह-आयुक्त माननीय श्री शशिकांत हेरलेकर साहेब व माननीय शिक्षणाधिकारी श्री आंबोकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे सर यांनी संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेले शैक्षणिक उपक्रम यांची माहिती दिली, माननीय मुख्याध्यापक श्री एम, एम, पाटील सर यांनी शाखेची माहिती दिली, विद्यालयाचा परिसर व चाललेली उपक्रम पाहून माननीय हेरलेकर साहेब यांनी समाधान व्यक्त केले व विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचाली करता यशाचा कानमंत्र दिला.
माननीय शिक्षणाधिकारी आंबोकर साहेब यांनी शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील आजची आव्हाने व नवीन प्रकल्प यांची माहिती दिली व अशा समाज पूरक कार्यक्रम करता काळोखे कुटुंबीयांना शुभेच्छा दिल्या त्यावेळी उपशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे मॅडम, उपशिक्षणाधिकारी मोरे साहेब ,श्री किशोर शहा, श्री शितल शहा ,श्री बंडोपंत काळोखे,उपमुख्याध्यापिका सौ ,बनें मॅडम, श्री महेश यादव ( भादूलकर )उपस्थित होते श्री संयम हुक्किरे सर यांनी सूत्रसंचालन केले.
या वेळी काळोखे परिवार, विध्यार्थी शिक्षक-शिक्षकेतर स्टाफ उपस्थित होते.