उचंगी प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह प्रशासनाला सूचना; जिल्हाधिकारी राहुल रेखावार उद्या जाणार प्रकल्पस्थळी

कोल्हापूर :
उचंगी प्रकल्पग्रस्तांशी तातडीने संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या व तातडीने निपटारा करा, अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह कोल्हापूर जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी दि. १ रोजी आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर पवार, पुनर्वसन अधिकारी श्रीमती अश्विनी जिरंगे आदी अधिकारी प्रकल्पस्थळी भेट देणार आहेत. या भेटीत ते प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, उचंगी प्रकल्पाच्या घळभरणीचे काम प्रकल्पग्रस्तांनी बंद पाडले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भातील समस्या व अडीअडचणी तातडीने जाणून घेऊन त्यांचा निपटारा करण्याच्या सूचना मंत्री मुश्रीफ यांनी दिल्या.
“तातडीने निपटारा करा……”
बैठकीत मंत्री मुश्रीफ म्हणाले, ज्या समस्या जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर संपणार्या आहेत, त्यांचा तातडीने निपटारा करा. जे विषय आयुक्तालय आणि वरिष्ठ पातळीवरील असतील त्यांचा तातडीने अहवाल तयार करा.