नात्यांच्या पवित्र बंधनाचे पालन करा – गीतांजली खोत

बिद्री प्रतिनिधी (अक्षय घोडके)
बोरवडे : संकटे क्षणभंगुर आहेत त्यांचा सामना करा. हसा, हसवत रहा, हसण्याला मुक्तपणे दाद द्या. यशस्वी जीवनाला समाधानाची जोड द्या.आपले आयुष्य इतरांना आदर्श वाटले पाहिजे असे जीवन जगा. दुःख, ताणतणाव बाजूला ठेवून माणुसकीचा झरा निर्माण करा. थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून नात्यांच्या पवित्र बंधनाचे पालन करा असे प्रतिपादन चांदेकरवाडी येथील महिला वक्त्या गीतांजली खोत यांनी केले.
बोरवडे विद्यालय बोरवडे (ता. कागल ) या विद्यालया मध्ये आयोजित केलेल्या ‘नात्यांचे पवित्र बंधन’ या कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ए. आर. वारके होते. यावेळी आर.पी. वारके यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी ई.डी. घोरपडे, मनीषा साठे,गीता बलुगडे, कीर्ती साळोखे, राधिका शिंदे, रेश्मा देवर्डेकर,कृष्णात साठे,विलास कांबळे उपस्थित होते.
आर. पी. वारके यांनी प्रास्ताविक केले. कीर्ती साळोखे यांनी आभार मानले.