ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गारगोटी हायस्कूल, गारगोटी प्रशालेची नवीन वास्तू प्रवेशासाठी सज्ज; अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व समाजातील दानशूर घटकांना वस्तू स्वरुपात मदत करण्याचे मुख्याध्यापकांकडून आवाहन.

गारगोटी :

गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी या प्रशालेने आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांना घडविण्याचे कार्य केले आहे. प्रशालेमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवीत आहेत. या शाळेमध्येच आपल्या पाल्याला प्रवेश मिळाला पाहिजे, यासाठी अनेक पालक प्रयत्न करत असतात. शाळा स्थापणेपासून ते आजपर्यंत या शाळेचे विद्यार्थी घडविण्याचे कार्य एका छोट्या इमारतीमध्ये सुरु होते. मात्र आता शाळेची इमारत नव्याने उभारण्यात आली आहे.

त्यामुळे या पुढील काळात सर्व आव्हाने पेलण्यासाठी व अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही साधनांची आवश्यकता आहे व त्यासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक मिलिंद पांगिरेकर यांनी सर्व आजी-माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी, पालक, हितचिंतक व समाजातील दानशूर व्यक्तींना वस्तू स्वरुपात मदत करण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांद्वारे केले आहे. 

नम्र आवाहन

 

गारगोटी हायस्कूल व श्री.समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटीच्या सर्व आजी, माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक, हितचिंतक यांना निवेदन करण्यात येते की, आपल्या शाळेसाठी आवश्यक असलेली सुसज्ज इमारत नव्याने बांधण्यात आली असून शाळा नवीन वास्तूत प्रवेश करत आहे.

शाळेची आजपर्यंतची वाटचाल ही आपणा सर्वांच्या सहकार्यानेच झाली आहे. या पुढील काळात सर्व आव्हाने पेलण्यासाठी व अधिक गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काही साधनांची आवश्यकता आहे.

शाळेसाठी वस्तू रूपाने (बेंच, ब्लॅक बोर्ड, कपाट व इतर शैक्षणिक साहित्य) देणगी स्वरूपात देणे विषयी आवाहन करत आहोत.

तरी इच्छुक आजी, माजी विद्यार्थी – विद्यार्थिनी, पालक व हितचिंतक यांनी शाळेसाठी आवश्यक भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्यासाठी वस्तूरूपाने देणगी देऊन. सहकार्य करावे ही नम्र विनंती.

संपर्क :

श्री.आर.वाय.देसाई – 9403108614
डॉ.आर.डी.पोवार – 9834835055
श्री.जी.डी.ठाकूर – 8446527927
श्री.आर.पी.गव्हाणकर – 9422626595

आपला,
मुख्याध्यापक, गारगोटी हायस्कूल व श्री. समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, गारगोटी.

 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks