ताज्या बातम्यानिधन वार्ता
गणपती राणोजी साळोखे यांचे निधन

गारगोटी :
शेणगांव(ता.भुदरगड) येथील कै. गणपती राणोजी साळोखे (वय-८५) यांचे मंगळवार दिनांक २१/०९/२०२१ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. महाराष्ट्र वन विभागातून वनपाल म्हणून ते सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, मुलगी, जावई, पुतणे, नातवंडे, असा मोठा परिवार आहे. शेणगांव गावचे पोलीस पाटील विजय साळोखे यांचे ते मोठे चुलते होत.
रक्षाविसर्जन गुरुवार दि. २३/०९/२०२१ रोजी सकाळी ०९ वाजता आहे.