ताज्या बातम्यासामाजिक
गणेश तरुण मंडळ व्यापारी पेठ अध्यक्षपदी आकाश रेंदाळे तर उपाध्यक्षपदी संदीप परीट यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगुड ता कागल येथील गणेश तरुण मंडळ व्यापारी पेठ मुरगूडच्या अध्यक्षपदी आकाश महादेव रेंदाळे, उपाध्यक्षपदी संदीप यशवंत परीट, सचिवपदी शुभम जयसिंग भोसले यांची, तर खजानिसपदी मयूर संभाजीराव आंगज यांची निवड करण्यात आली. मंडळामार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षी गोरगरिबांना मदत करणार असल्याचे नूतन अध्यक्ष आकाश रेंदाळे यांनी सांगितले. यावेळी मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.