गड्या, आपली सायकलच बरी! देतेय शारीरिक व्यायामाची हमी!!; वाढते इंधन दर व एस.टी बंद मुळे सायकल रस्त्यावर सुसाट

कुडूत्री प्रतिनिधी : सुभाष चौगले
एक काळ असा होता की आधुनिक वाहने येण्याआधी सायकलचा मोठया प्रमाणात वापर व्हायचा आणि सायकल चालवताना जो आनंद मिळायचा तो वेगळाच असायचा, कालांतराने प्रगत वाहने आलीत आणि रस्त्यावर धावणारी सायकल अडगळीत साफडली. अगदी मोजक्याच प्रमाणात तिचा वापर सुरू राहिला. सद्या एस .टी कर्मचाऱ्यांचे विविध मागणीसाठी आंदोलन सुरू आहे.त्यामुळे सर्व प्रवास बंद आहे. पेट्रोल डिझेलचे वाढलेले भाव पाहता आता मोटार सायकली विश्रांती घेऊ लागल्या आहेत.आणि बरचेजन “गड्या आपली सायकल बरी” म्हणत सायकलचा प्रवासासाठी वापर वाढला आहे.

गरिबांची मोटार सायकल म्हणून सायकलकडे पाहिले जाते.अनेकांनी सायकलला सोबती मानले आहे.प्रगत आणि आधुनिक वाहने येण्याआधी सायकलनेच प्रवासासाठी आधार दिलेला आहे.प्रवास ,जनावरांना चारा आणणे,आणि शेतीकामात वापर,तसेच शारीरिक व्यायामाला महत्व देणारी सायकल घरोघरी प्रियच असायची.
गेल्या अनेक दिवसांपासून पेट्रोल,डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.अशातच कोरोनामुळे आर्थिक परिस्थिती मंदावली आहे.अशा वेळी धावणाऱ्या मोटार सायकली ऐवजी सायकल प्राधान्य दिले आहेत.अनेकजण बाजारपेठेतून सायकली खरेदी करू लागले आहे.इंधनाचे दर आणखीन वाढू लागले तर मात्र सायकल आपले स्थान बळकट करील यात शंका नाही.