ताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडहिंग्लजकरांचे फुटबॉल प्रेम कौतुकास्पद : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे गौरवोद्गार ; विनर्स एफ. सी.च्या आंतरराज्य फुटबाॕल स्पर्धेत मंत्री मुश्रीफ यांची लक्षवेधी कीक        

गडहिंग्लज प्रतिनिधी:

गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवरील प्रेम कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले. विनर्स एफ.सी. ने इतक्या मोठ्या पद्धतीने स्पर्धा घेतल्याचे कौतुक करत आपण गडहिंग्लज फुटबॉलसाठी व नवोदित खेळाडुंना प्रोत्साहन देण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. प्रेक्षकांची झालेली गर्दी हीच या स्पर्धेची पोचपावती व गडहिंग्लजकरांचे फुटबॉलवर असलेले प्रेम दर्शवते असेही ती म्हणाले.  
       
यावेळी फायनल मॅच सुरू करताना मंत्री मुश्रीफ यांनी एखाद्या कसलेल्या फुटबॉलपटूप्रमाणे फुटबॉलला मारलेल्या लक्षवेधी कीकचे सर्वच उपस्थित फुटबॉलप्रेमींनी टाळ्या वाजवून कौतुक केले. एका खेळाडूने तर लय भारी कीक असे म्हणत मंत्री श्री. मुश्रीफ यांचे कौतुक केले.
      
विनर्स एफ. सी. आयोजित भव्य फुटबॉल स्पर्धा -२०२१  या स्पर्धेसाठी दोन लाखांची पारितोषिके असून कोल्हापुरसह इतर राज्यातील नामवंत संघाचा सहभाग या स्पर्धेमध्ये आहे. उद्घाटनासाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यासह जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील , सोमगोंडा आरबोळे, अनिल कुराडे , बसवराज आजरी, महेश सलवादे, अमर मांगले, उदय परिट, गुंडया पाटील, प्रशांत शिंदे, महेश देवगोंडा, मलिक आरबोळे, विनायक काळगे, रोहित चव्हाण, प्रकाश नांद्रे आदी प्रमुख उपस्थित होते. 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks