ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रा.पं. च्या 194 रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

कोल्हापूर प्रतिनिधी :
राज्यातील 4 हजार 554 ग्रामपंचायतींच्या रिक्त झालेल्या 7 हजार 130 जागांसाठी राज्य निवडणूक आयोगाने बुधवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. यामध्ये जिल्ह्यातील 139 ग्रामपंचायतींतील 194 जागांचा समावेश आहे. 21 डिसेंबर रोजी या जागांसाठी मतदान होणार आहे. चंदगड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या 57 रिक्त जागांचाही यामध्ये समावेश आहे. 22 नोव्हेंबर रोजी तहसीलदार निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करणार आहेत. 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करता येणार आहे. 7 डिसेंबर रोजी छाननी होईल. 9 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. 21 डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या कालावधीत मतदान होणार असून, 22 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.