बुधवारी कागलमध्ये महिलांसाठी मोफत कॅन्सर तपासणी शिबिर : नवोदिता घाटगे राजमाता जिजाऊ महिला समिती व कोल्हापूर कॅन्सर सेंटरचा संयुक्त उपक्रम

कागल, प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथे बुधवारी तारीख 20 रोजी महिलांसाठी मोफत कॅन्सर निदान व मार्गदर्शन शिबिर होणार आहे.अशी माहिती राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे यांनी दिली. राजमाता जिजाऊ महिला समिती व कोल्हापूर कॅन्सर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती देताना त्या म्हणाल्या, शाहू साखर कारखान्याचे चेअरमन राजे समरजितसिंह घाटगेव राजमाता जिजाऊ महिला समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्सरमुक्त कागल अभियान राबवले जात आहे.महिलांमध्ये हा आजार लपवून ठेवण्याचे प्रमाण अधिक आहे. कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांमध्ये प्राथमिक अवस्थेत या आजाराचे निदान झाल्यास उपचारांनी तो पुर्णपणे बरा होऊ शकतो. यासाठी कागल व गडहिंग्लज विभागामध्ये अशा पद्धतीच्या शिबिरांचे आयोजन केले जाणार आहे.याची सुरवात कागल येथील श्रीराम मंदिर मधील शिबिराने होत आहे.सकाळी दहा ते पाच या वेळेत हे शिबिर होणार आहे. या शिबिरात संपूर्ण तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच लक्षणे आढळल्यास उपचार बाबत कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या तज्ञ डॉ.सौ.रेश्मा पवार मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिराचा महिलांनी लाभ घ्यावा. असे आवाहनही त्यांनी केले.