म्हाकवेत वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडून एनडीआरएफचा धनादेश प्रदान.

म्हाकवे :
महापुरात वाहून गेलेल्या म्हाकवे ता. कागल येथील सचिन जयराम पाटील या तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाखांच्या मदतीचा धनादेश देण्यात आला. एनडीआरएफचा मदतीचा धनादेश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कुटुंबीयांकडे दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, आठवड्यापूर्वी ओढ्याच्या पुराच्या पाण्यातून वाहून जाऊन सचिनचा मृत्यू झाला होता. कर्त्या युवकांचा दुदैवी मृत्यू झाल्याने या कुंटुंबियांवर संकट ओढविले आहे. कर्ता कुटुंब प्रमुखच गेल्यामुळे हे कुटुंब उघड्यावर पडले आहे.
या मदतीबरोबरच शासनाकडून पाच लाखांची मदत, कंपनीकडूनही या कुंटुंबियांला भरीव आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही श्री. मुश्रीफ यांनी सांगितले.
यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, माजी प स सदस्य ए. वाय. पाटील, सरपंच सौ. सुनिता चौगुले, उपसरपंच धनंजय पाटील, रमेश पाटील, सिद्राम गंगाधरे आदी उपस्थित होते.
कुटुंबीयांना वाऱ्यावर सोडणार नाही…….
“चिमुकल्या कु. शिवन्याच्या उच्च शिक्षणापर्यंतची जबाबदारी व एक लाख रुपयेही शिवन्याच्या नावे ठेवणार असल्याची घोषणा श्री. मुश्रीफ यांनी आठवड्यापूर्वीच केली आहे. तसेच, केडीसीसी बँकेसह रेमंड कंपनी व शासनाकडून मदत मिळवून देण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.