ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कागलचा जयसिंगराव तलाव काटोकाट भरण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न ;शाहू पाणीपुरवठा योजनेच्या उपशातून पाणीपातळी वाढवण्याचा शुभारंभ ;संपूर्ण वीजबिल भरणार कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागलचा ऐतिहासिक श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव म्हणजे शहराची अस्मिता जणू. कागल शहरवासीयांचा अत्यंत महत्त्वाचा व जिव्हाळ्याचा विषय असलेल्या या तलावातूनच संपूर्ण शहराला पिण्याचा पाणीपुरवठा होतो. गेल्यावर्षी नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या प्रयत्नातून थेट काळमावाडी धरणातून ६५ किलोमीटरच्या कालव्यातून आलेले पाणी या तलावात सोडले आहे. दरम्यान; हा तलाव सदैव तुडुंब काटोकाठ भरून राहावा, यासाठी कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसने शुभारंभ केला.

याबाबत अधिक माहिती अशी, कागलचा श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव दरवर्षीच भरतो. परंतु; यावर्षीच्या अपुऱ्या पावसामुळे अकरा फुटावरच पाणीपातळी आहे. जुन्या काळात पाटबंधारे विभागाने बसविलेल्या दरवाज्यामुळे पाणीपातळी अकरा फूटच राहते. गेली तीन-चार वर्ष झालेल्या चांगल्या पाऊसमानामुळे पाणीपातळी चांगली असायची. यावर्षी झालेल्या कमी पाऊसमानामुळे ती अकरा फुटाची पाणीपातळी स्थिर राहणारच आहे.

यावेळी बोलताना केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, आमचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आम्हाला कालच सूचना दिल्या. आम्ही कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व नामदार श्री. मुश्रीफसाहेब यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत श्री. शाहू पाणीपुरवठा संस्थेच्या मदतीने कामाला लागलो. या पाणीपुरवठा योजनेच्या पाईपमधून उपसा करून दररोज तलावामध्ये पाणी सोडणार आहे. ज्यामुळे दररोज साधारणता सहा इंच पाणी पातळी वाढेल. याप्रमाणे तलावात जास्तीत -जास्त पाणी भरून घेण्याचे काम आम्ही कागल शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने करणार आहोत. सावंत मळ्याच्या चेंबरपासून पाणी उचलून तलावामध्ये सोडले जाणार आहे. या प्रयत्नामुळे उन्हाळ्यामध्ये पाण्याची अडचण येणार नाही. दरम्यान; नामदार श्री. मुश्रीफसाहेब यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना देऊन कालव्यामध्ये साठलेले पाणीही २० अश्वशक्तीचे मोटरपंप बसवून तलावामध्ये घेण्याचे काम सुरू आहे. या सर्व वीज बिलाची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने उचललेली आहे.

यावेळी केडीसीसी बॅंकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्याबाबा माने, माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, ज्येष्ठ नगरसेवक चंद्रकांत गवळी, माजी नगराध्यक्ष नवल बोते, यशवंत गुरव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष संजय चितारी, माजी नगराध्यक्ष अस्लम मुजावर, शाहू पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन शिवाजी भगले, नगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकारी विजय पाटील, नामदेवराव पाटील-मळगेकर, माजी उपनगराध्यक्ष विवेक लोटे, सतीश घाडगे, संजय ठाणेकर, रणजीत बन्ने, संग्राम लाड, सम्राट सणगर, इरफान मुजावर, युवक अध्यक्ष सागर गुरव, अमोल डोईफोडे, सागर दावणे, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks