मुरगूडमध्ये माजी खासदार संजय मंडलिक यांची एकषष्ठी विविध उपक्रमांनी साजरी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
माजी खासदार संजय मंडलिक यांच्या एकषष्ठी निमित मुरगूडमध्ये विविध उपक्रम पार पडले . मुरगूड ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप व चिमगाव आश्रम शाळेतील मुलांना खाऊ वाटप करण्यात आले .
मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके , माजी उपनगराध्यक्ष जयसिंग भोसले माजी नगरसेवक एस .व्ही . चौगले किरण गवाणकर सुहास खराडे दत्तात्रय मंडलिक दिपक शिंदे दिलीप कांबळे ‘ संभाजी आंगज दिगंबर परीट सर्जेराव पाटील आदि उपस्थित होते .
चिमगाव आश्रम शाळेतील अनाथ मुलांना फळे व खाऊ वाटप माजी नगरसेवक मारुती कांबळे विक्रम गोधडे राजू भाट विनायक मुसळे (मुरगूडकर ) सचिन भारमल ‘ राजू कांबळे , सूरज सुतार शुभम भोसले अक्षय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले .
याप्रसंगी बोलताना माजी नगराध्यक्ष नामदेव मेंडके म्हणाले ‘ माजी खासदार संजय मंडलिकांचे नेतृत्व चारित्र्यसंपन्न संयमी व धाडसी नेतृत्व आहे . त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अनेक विकास कामे झाली . त्यांचा लोकसभा निवडणूकीत पराभव झाला असला तरी त्यांच्याशिवाय पर्याय नाही .
स्वागत के .एम . लोकरे यांनी केले . नेताजी आंगज यांनी प्रास्ताविक केले तर श्री मांगले सर यांनी आभार मानले .