जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारच : माजी खासदार राजू शेट्टी

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
पूरग्रस्तांच्या नुकसानीकडे सरकार बघ्याची भूमिका घेत आहे हे वेदनादायी आहे. त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या आग्रही मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणारच, कोणतेही कारण सांगून गुन्हे नोंदवा नाहीतर काय करायचे ते करा अगदी अफगाणिस्थानने भारताबरोबर युद्ध केले तरी ठरलेला विराट मोर्चा हा काढणारच, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
शिंदेवाडी (ता. कागल) येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शिंदेवाडीचे माजी सरपंच व बिद्री कारखान्याचे संचालक दत्तात्रय खराडे होते. सरपंच परिषद व चिकोत्रा खोरा संघर्ष समितीने आक्रोश मोर्चाला पाठिंबा व्यक्त केला.
मी सरकार विरोधी आंदोलन करतोय म्हणून शेट्टींनी आघाडी सोडली की काय, अशी चर्चा होईल पण शेतकऱ्यांसाठी राजकारण हित कधीच पाहणार नसून विराट मोर्चा काढून सरकारला गुडघे टेकावयाला भाग पाडू, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.