ताज्या बातम्यामहाराष्ट्र
माजी आमदाराच्या सुपुत्राचा मुश्रीफांच्या कट्टर कार्यकर्त्याकडून ‘करेट’ कार्यक्रम
या गटातही निकालाची केवळ औपचारिकता शिल्लक होती.

कोल्हापूर :
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत इतर संस्था गटात सत्तारूढ गटाचे उमेदवार व विद्यमान संचालक भैय्या माने यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत या गटात आपलाच ‘डंका’ पिटला.
या गटातील विरोधी पॅनेलचे उमेदवार माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांचे पुत्र क्रांतिसिंह पवार यांचा पराभव झाला. श्री. माने यांना २२६६ तर श्री. पवार यांना १६५५ मते मिळाली. या गटातही निकालाची केवळ औपचारिकता शिल्लक होती. अपेक्षप्रमाणे भैय्या माने यांनी विजय मिळवत सत्तारूढ गटाला आणखी एका जागेवर विजय मिळवून दिला.