बिद्री साखर कारखान्याने माजी संचालक बापूसाहेब शेणवी यांचे निधन.

कागल :
तालुक्यातील बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक बापूसाहेब दौलू शेणवी ( रा. सोनाळी, वय -७८ ) यांचे पंढरपूर येथे मंगळवारी (दि.१४)हृदय विकाराने निधन झाले. ४० वर्षापासून ते वारकरी संप्रदायाचे काम करत होते.एकादशी निमित्त पंढरपूरला देवदर्शनासाठी गेले असताना त्यांचे निधन झाले.
सोनाळी गावचे माजी सरपंच, बिद्री साखर कारखान्याचे माजी संचालक ,गावातील विविध संस्थांचे संस्थापक संस्थापक व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते , मंडलिक गटाचे प्रमुख व निष्ठावंत कार्यकर्ते, गावातील महादेव मंदिराच्या जीर्णोद्धाराचे प्रणेते, उत्कृष्ट शाहीर, उत्तम गायक,गायन स्पर्धेतील अनेक पारितोषिकाचे मानकरी , वारकरी संप्रदायाचे मार्गदर्शक तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आणि मनमिळावू ,शांत व संयमी व्यक्तिमत्व अशी त्यांची परिसरात ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी ,मुलगा, सून ,दोन विवाहीत मुली ,नातवंडे असा परिवार आहे. मंडलिक साखर कारखान्याकडील शेअर विभाग प्रमुख रणजीत शेणवी यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन गुरुवारी ( ता.१६ डिसेंबर) सकाळी ८ .३० वाजता सोनाळी येथे आहे .