श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध; नूतन संचालक मंडळामध्ये सात नव्या चेहऱ्यांना संधी.

कागल प्रतिनिधी :
येथील श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्याची सन २०२१ ते २०२६ ची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. बहुराज्य सह संस्थांचा कायदा २००२ मधील मधील नियम १९ परिच्छेद ५ ची तरतूदीनुसार निवडणूक निर्णय अधिकारी अरूण काकडे यांच्याअध्यक्षतेखाली कारखाना कार्यस्थळावर झालेल्या सभेत त्यांनी ही घोषणा केली. नूतन संचालक मंडळामध्ये सात नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे.
यावेळी श्री काकडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते सत्कार केला. राजे समरजितसिंह घाटगे, श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, अमरसिंह घोरपडे, माजी आमदार वीरकुमार पाटील यांच्यासह नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.
बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळ सदस्य नावे गटनिहाय अशी आहेत .
अ वर्ग उत्पादक सभासद गट –
श्रीमंत समरजितसिंह विक्रमसिंह घाटगे,
श्रीमंत श्रीमती सुहासिनीदेवी विक्रमसिंह घाटगे,
अमरसिंह गोपाळराव घोरपडे,वीरकुमार आप्पासो पाटील,धनंजय सदाशिव पाटील,
सचिन सदाशिव मगदूम,संजय रामचंद्र नरके,
यशवंत जयवंत माने,शिवाजीराव शंकर पाटील,
सतिश रायगोंडा पाटील, प्रा.सुनिल सदाशिव मगदूम
उत्पादक सभासद गट(महिला)
सौ.रेखाताई प्रताप पाटील,सौ.सुजाता रंगराव तोरस्कर
अनुसुचित जाती/जमाती गट-
भाऊसो शिवराम कांबळे
ब वर्ग बिगर उत्पादक सभासद सहकारी संस्थां गट-
युवराज अर्जुनराव पाटील
यावेळी जेष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.
सुरूवातीला राजर्षि छत्रपती शाहू महाराज यांच्या पूतळ्याचे व स्व.विक्रमसिंहराजे घाटगे प्रतिमा पूजन केले.
स्वागत कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांनी केले.आभार अमरसिंह घोरपडे युवराज पाटील यांनी मानले.वदेमातरम् होऊन सभेचे कामकाज समाप्त झाले.
यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, स्व विक्रमसिंहराजे घाटगे यांच्या पश्चात मलाही सर्व सभासदांनी चांगली साथ दिल्यामुळेच कारखान्याचा नाव लौकिक कायम राखण्यात मी यशस्वी झालो आहे. प्रतिकूल परिस्थितीत सीमाभागातील सभासदांनी दिलेली साथ मोलाची आहे. सभासद व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे शाहू साखर कारखाना देशात नंबर वन ठरला आहे.सहकारी साखर कारखानदारी अडचणीत आहे. स्व.राजे साहेबांची शिकवण सतत माझ्या स्मरणात आहे. माझ्यामुळे संस्था नाही तर संस्थेमुळे मी आहे. त्यामुळे शाहूचा कारभार राजकारण विरहित व सभासद हिताचा करण्याचा यापुढेही माझा प्रयत्न राहील.
राजकीय ताळेबंदही कळतो
जेष्ठ संचालक माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांनी शाहू साखर कारखान्याच्या स्थापनेपासूनच्या घडामोडीचा आढावा घेतला व विद्यमान चेअरमन राजे समरजितसिंह घाटगे यांच्या कामकाजाची प्रसंशा करताना ते सी.ए असल्यामुळे त्यांना कारखान्यांचा ताळेबंद चांगल्या पद्धतीने समजतो. याचाच संदर्भ देत श्री. घाटगे यांनी मला कारखान्याचा ताळेबंद तर कळतोच परंतु आता या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय ताळेबंद कसा जमवायचा हेही कळाले आहे . अशी मिश्किल टिप्पणी केली. त्याला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.