करवीर तालुक्यात नद्यांच्या काठावरील पाचशे एकर शेतीतील भातपिके वाया; खरीप पिकांचा शेतकऱ्यांना बसला फटका

सावरवाडी प्रतिनिधी :
प्रचंड स्वरुपात झालेल्या अतिवृष्टी ,महापुराचा फटका भोगावती , तुळशी, कुंभी या नद्यांच्या परिसरातील सुमारे पाचशे एकर शेतीतील पिकांना बसला आहे. करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकेच वाया गेल्याने बळीराजा चिंताग्रस्त बनाला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात बळीराजाने कष्टाने खरीप पिके जगविली परंतू अतिवृष्टी , महापुराने नदी काठावरील खरीप पिकांच्यावर घाला घातला . जुलै महिन्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे भोगावती, तुळशी, कुंभी नद्यांच्या पात्रातील पाणी शेतीत घुसले .नद्यांच्या पात्रातील महापुराचे पाणी तब्बल पंधरा दिवस शेतीमध्ये राहिल्याने भात पीके कुजली गेली.
महापुराचा फटका करवीर तालुक्याच्या पश्चिम भागातील नद्यांच्या काढावरील शेतीला बसला . खरीप पिकातून शेतकऱ्यांना जबर आर्थिक फटका बसलेला आहे . नद्यांच्या परिसरातील शेतकऱ्यांना जादा आर्थिक मदत शासनाने करण्याची मागणी शेतकऱ्यांनी माध्यम प्रतिनिधी शी बोलतांना केली.