ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मळगे खुर्द येथे बोनस वाटपाच्या कारणावरून मारामारी; परस्पर ७ जणांविरोधात मुरगुड पोलिसांत तक्रार दाखल

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मळगे खुर्द (ता. कागल) येथे श्रीकृष्ण दूध संस्थेच्या सभासदांना दीपावलीसाठीच्या बोनस वाटपाच्या कारणावरून नातलगांमध्ये लोखंडी गजाने मारहाण झाली. यामध्ये सचिन वसंत पाटील (वय ३६) व महादेव मारुती पाटील (वय ५२) हे दोघे जखमी झाले.
मुरगूड पोलीस ठाण्यामध्ये परस्पर ७ जणांविरोधात तक्रार नोंद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी बोनसबाबत मिटिंग झाली. सभासदांना २५ टक्के बोनस देण्याबाबत महेशकुमार पाटील यांनी आग्रह धरला होता. आज महेशला राजेशकुमार मधुकर पाटील, वैभव भास्कर पाटील आणि भास्कर कृष्णाजी पाटील यांनी गजाने मारहाण केली. याच कारणावरून वैभव पाटील यानेही महेशकुमार विष्णू पाटील, साताप्पा राजाराम पाटील आणि सचिन वसंत पाटील यांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे.