ताज्या बातम्यामहाराष्ट्र

फये प्रकल्पाच्या गळतीचा प्रश्न २२ वर्षांपासून अनुत्तरीत; मेघोलीच्या घटनेने परिसरातील नागरिक भयभित

गारगोटी प्रतिनिधी :

भुदरगड तालुक्यातील मिणचे खोरीचा कायापालट करणाऱ्या फये प्रकल्पाच्या गेटमधून गेली २२ वर्षे प्रचंड प्रमाणात गळती सुरू असून, पाटबंधारे खात्यास ही गळती काढण्यास अपयश आल्याने या गळतीचा प्रश्न अनुत्तरीत राहिलेला आहे, नुकतीच गळतीमूळे मेघोली प्रकल्प फुटून शेतकऱ्यांचे जिवीत हानिसह शेतीचेअपरिमित नुकसान झाले आहे या घटनेची पुनरावृती फये प्रकल्पाच्या गळतीमूळे होईल की काय अशी भिती या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून भिती व्यक्त केली जात आहे.तेव्हा सबंधीत खात्याने या प्रकल्पाची गळती ताबडतोब काढावी अशी मागणी या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून मोठया प्रमाणात होत आहे.

मिणचे परिसर हा पूर्वी उजाड बोडका माळ पावसाच्या पाण्या व्यतिरीकत कुठलाही मार्ग नव्हता पिण्याच्या पाण्याची वाणवा होती तत्कालीन लोकप्रतिनिधी व जनरेटयातून सन १९९६ साली शासन निर्णयान्वये ४०३.४४ लक्ष किमतीच्या या प्रकल्पास मान्यता मिळाली सन१९९८ साली या प्रकल्पाच्या कामास सुरवात झाली पायाखुदाईपासूनच या प्रकल्पाचे काम वादग्रस्त ठरले या प्रकल्पाची उंची ३३.४२ मी, लांबी ३५५.६५ मी व पाणी साठवणूक क्षमता १३८.८८द.लं. घनफूट आहे. प्रकल्पाचे ९७२ हेकटर लाभक्षेत्र असून ७००हेक्टर सिंचन क्षेत्र आहे, या प्रकल्पातून शेतीच्या पाण्यासाठी मोरओहोळेवर १२ बंधारे बांधण्यात आले आहेत पण त्यामध्येही पुरेसा पाणीसाठा होवू शकला नाही या प्रकल्पाच्या गळतीबाबत सन २००५ साली तत्कालीन आमदार के.पी पाटील यांनी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारला होता, तत्कालीन जलसंपदामंत्र्यांनी धरण सुरक्षितता संघटना नाशिक यांनी सुचविलेल्या उपाययोजनेप्रमाणे कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, पण आज ही गळती काढण्यास संबधीत खात्यास यश आले नाही, तालूक्यामध्ये नुकतीच गळतीमूळे मेघोली प्रकल्प फुटून जिवीत हानीसह शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, या घटनेमुळे फये प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील शेतकरीही पुरता धास्तावला आहे, फये प्रकल्पाची गळती न काढल्यास मेघोली प्रकल्पासारखी घटना घडण्यास वेळ लागणार नाही तेव्हा शासनाने मोठी दुर्घटना घडण्याआधी या प्रकल्पाच्या गेटची गळती काढावी अशी मागणी या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्यातून मोठ्या प्रमाणात होत आहे.

 

फये प्रकल्पाच्या गेटला गेली २२ वर्षे प्रचंड गळती आहे, शासनाकडे वारंवार मागणी करुनही ही गळती काढण्यात आली नाही. गळतीबाबत उपाययोजना केली नाही तर मेघोली प्रकल्पासारखी आपत्ती यायला वेळ लागणार नाही.

राम पाटील
सचिव, फये धरण कृती समिती.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks