शेतीला एआयची जोड दिल्यास शेती किफायतशीर : डॉ. अशोक कडलग ; सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त शेतकरी मेळावा

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेणे ही काळाची गरज आहे. पारंपरिक शेतीला एआयची जोड दिल्यास शेती किफायतशीर होईल, असे प्रतिपादन व्हीएसआयचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. अशोक कडलग यांनी केले.
हमिदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष माजी खासदार संजय मंडलिक होते. भगवान पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उपाध्यक्ष आनंदराव फराकटे, प्रकाश पाटील, शिवाजीराव इंगळे, विश्वासराव कुराडे, नंदकुमार घोरपडे, शहाजी यादव आदी उपस्थित होते.
एआयचा वापर ही काळाची गरज….
पिकांवर येणाऱ्या किडी अनेक प्रकारच्या असून हुमणी, खोडकिडींचा प्रादुर्भावही होत आहेच. त्यामुळे भावी पिढीला शाश्वत शेतीची भेट देण्यासाठी एआयचा वापर ही काळाची गरज असल्याचा सल्ला डॉ. जाधव यांनी दिला.