ताज्या बातम्या

कोगे येथे आडसाली ऊस नोंदीसाठी शेतकऱ्यांची  झुंबड

सावरवाडी प्रतिनिधी :

करवीर तालुक्यातील कोगे  येथील कुंभी कासारी साखर कारखाण्याच्या शेती विभागीय कार्यालयात आडसाली ऊस लागणी नोंदीसाठी शेतकऱ्यांची  एकच झुंबड उडाली होती . ऊस लागणी नोंदीसाठी मात्र सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला होता. 

ऊस लागणी  नोंद होण्यासाठी सकाळपासुनच शेतकऱ्यांनी गर्दी केली होती  कोगे येथील शेती कार्यालयात  नियोजनाचा अभाव आढळून आला . कोरोना नियम न पाळता सभासद नोंद करण्यासाठी गर्दी करून उभारले होते. तसेच रांगेमध्ये सामाजिक अंतर न राखता सभासद उभे होते .तसेच नोंद घेण्याच्या रांगेमध्ये अनेकदा वादावादी प्रकर  घडत होते.

आडसाली उसाची नोंद करण्यासाठी  कोगे परिसरात जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात आडसाली उसाची लागण केली जाते व कारखान्याच्या नियमाप्रमाणे एक तारखेला नोंद केली जाते. अनेक सभासद काहीवेळा बोगस नोंदी देतात अशाही तक्रारी झाल्या आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks