कागल तालुक्यातील माद्याळ येथे उसाच्या शेतात गांज्याची लागवड , शेतकऱ्यांस अटक

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील माद्याळ येथे पोलिसांनी एका शेतात छापा टाकून २ लाख १९ हजार ५७० रुपये किमतीचा २१ किलो ९५७ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिनकर कृष्णा राणे (वय ७५) यांना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १०:४० वाजता माद्याळ गावाच्या हद्दीत कोंडार नावाच्या शेतात ही कारवाई करण्यात आली. आरोपी राणे यांनी त्यांच्या मालकीच्या गट क्रमांक १५५० मधील ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केली होती.पोलिसांनी घटनास्थळावरून गांजा, एक मोबाईल फोन आणि एक सिम कार्ड जप्त केले आहे. मुरगुड पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सुरू आहे.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक पोवार, प्रशांत कांबळे, सतीश जंगम, राजूललीता कांबळे, रोहित मर्दाने, विजय इंगळे आणि हंबीरराव अतिग्रे यांचा समावेश होता. हे सर्व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत. अधिक तपास मुरगूड पोलीस उपनिरीक्षक प्रियांका वाकळे करीत आहेत.