ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुरगूडच्या सुवर्णमहोत्सवी श्री . लक्ष्मी -नारायण नागरी सह .पतसंस्थेच्या चेअरमनपदी किशोर पोतदार तर व्हा . चेअरमनपदी दत्तात्रय कांबळे

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड ता . कागल येथिल सर्वांच्या परिचयाची व आपुलकीची सुवर्णमहोत्सवी श्री ” लक्ष्मीनारायण नागरी सहकारी पतसंस्थेच्या सन२०२३ते २०२७या सालाकरीता चेअरमनपदी श्री . किशोर विष्णुपंत पोतदार यांची तर व्हा . चेअरमनपदी श्री . दत्तात्रय गुंडू कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली .
या निवडप्रसंगी अध्यक्षपदी सहाय्यक निबंधकसो-श्री . समीर जांबोटकर हे होते .

या निवडीनंतर चेअरमन किशोर पोतदार गहिनीनाथ समाचारशी बोलताना म्हणाले सातत्यपूर्णपणे ऑडिट वर्ग ” अ ” प्राप्त करणाऱ्या संस्थेतर्फे गेल्या आर्थिक वर्षात संस्थेला १ कोटी३१ लाखांचा विक्रमी निव्वळ नफा झाला असून संस्थेकडे ८५कोटीवर ठेवी जमा आहेत .५८ कोटींच्यावर कर्जवाटप करण्यात आले असून त्यापैकी सोनेतारणावर३८ कोटी इतक्या रकमेचे सुरक्षित कर्ज वितरण करण्यात आले आहे . उर्वरित रकमेची सुरक्षित गुंतवणूक करण्यात आली आहे . सुमारे ४०० कोटींचा व्यवहार करण्याऱ्या या संस्थेच्या चेअरमनपदी माझी निवड केली याचा मला सार्थ अभिमान वाटतो . माझ्यावर सर्वानी विश्वास दाखवून मला कार्यभार सांभाळण्याची जबाबदारी सोपवली त्याच विश्वासाने संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीपथावर भरारी घेण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन .यावेळी मावळते चेअरमन मा . अनंत फर्नांडीस व मावळते व्हा . चेअरमन मा .विनय पोतदार यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला .

या निवडीनंतर मुरगूडच्या श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सर्व पदाधिकारी किरण गवाणकर , प्रकाश सणगर, हाजी धोंडिराम मकानदार , शशिकांत दरेकर , निवास कदम , साताप्पा पाटील , संदीप कांबळे , नामदेवराव पाटील , प्रदिप वेसणेकर ,यानीं श्री .लक्ष्मीनारायण पतसंस्थेच्या मुख्य शाखेच्या सभागृहात जाऊन चेअरमन किशोर पोतदार व व्हा . चेअरमन दत्तात्रय कांबळे यांचा पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या .

या चेअरमन , व्हा . चेअरमन निवड प्रसंगी पतसंस्थेचे जेष्ठ संचालक श्री . जवाहर शहा , पुंडलीक डाफळे, अनंत फर्नांडीस , संचालक सर्वश्री विनय पोतदार , दत्तात्रय तांबट , चंद्रकांत माळवदे ( सर ) , रविंद्र खराडे , रविंद्र सणगर , संचालिका सौ . सुजाता सुतार , सौ . सुनिता शिंदे , तज्ञ संचालक जगदिश देशपांडे , व श्रीमती भारती कामत, कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी , सचिव मारूती सणगर , मुरगूडच्या शाखाधिकारी सौ . मनिषा सुर्यवंशी, राजेन्द्र भोसले ( शाखा सेनापती कापशी ) , रामदास शिऊडकर ( शाखा सावर्डे बुII ) , अनिल सणगर ( शाखा कूर ) , के.डी. पाटील ( शाखा सरवडे ) , अंतर्गत तपासनीस श्रीकांत खोपडे , संस्थेचे सर्व सेवक वृंद उपस्थित होते . या नूतन चेअरमन पोतदार व्हा . चेअरमन कांबळे यांचे सर्व’ स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks