शिंदेवाडी येथे सिलेंडर गळतीमुळे आग लागल्याने प्रापंचिक साहित्याचे नुकसान ; अग्नीबंब वेळेत पोचल्यामुळे जिवीतहानी टळली

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी (ता.कागल) येथे सिलेंडर गळतीमुळे आग लागली .सुशांत धोंडीराम शिंदे यांचे राहते घरी सकाळी ठीक 10.00 च्या दरम्यान अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.
अचानक आग लागल्यामुळे घरातील लोकांनी आग विझण्याचा प्रयत्न केला. पण ती आग आटोक्यात न आलेमुळे व धुराचे प्रचंड लोट घरातून बाहेर पडत असलेचे लक्ष्यात येता आजूबाजूच्या नागरिकांनी मुरगुड नगरपालिकेच्या अग्नीशामक दलाला ही माहिती कळवली.मुरगुड नगरपालिकेचे अग्निबंब वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आली .यामध्ये प्रापंचिक साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अग्निबंब वेळेत पोहचल्याने मोठी जिवीतहानी टळली.
महिलांनी सिलेंडर वापरताना योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. दरम्यान बाळूमामा इंडियन गॅस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.सदरच्या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.