प्राची पोवारच्या व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
हळदवडे ( ता- कागल ) येथील कु . प्राची एकनाथ पोवार ( इ .१२वी ) हिने रेखाटलेल्या २० व्यक्तिचित्रांचे प्रदर्शन हळदवडे येथील जोतिबा मंदिर येथे भरवण्यात आले होते . या प्रदर्शनाचे उद्घाटन दुय्यम निबंधक मुरगुड श्रेणी एकचे अधिकारी एन डी गोंधळी यांच्या हस्ते झाले .
लहाण पणापासुन चित्रकलेची आवड असलेली चौंडेश्वरी हायस्कूलची माजी विद्यार्थिनी प्राची एकनाथ पोवार हिने ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंची चित्रे हुबेहुब रेखाटली आहेत . यामध्ये छ . शिवाजी, छ . शाहु महाराज, म . गांधी, पं .नेहरू, सरदार पटेल, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, लो . टिळक, डॉ .आंबेडकर, डॉ .कलाम, म .फुले, सावित्रीबाई आदि व्यक्तिचित्रे उत्तम रेखाटली आहेत . यापूर्वी तिने शालेय स्तरावर एलीमेंटरी, इंटरमिजीएट स्पर्धत ‘अ’ श्रेणी मिळवली आहे . तसेच स्व .विक्रमसिंह घाटगे जयंतीनिमित्त चित्रकला स्पर्धत प्रथम क्रमांक पटकावला आहे .
प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी चौंडेश्वरी हायस्कूलचे मुख्याध्यापक जी के भोसले ,स्टॅम्प रायटर शिवाजी वारके, युवराज साठे, हळदवडे सरपंच उत्तम सुतार, उपसरपंच सरिता आस्वले ,करंजीवणे सरपंच दगडू शेटके ,नामदेव भराडे, संजय आंग्रे, साताप्पा काशीद , हळदवडे ग्रामपंचायत सदस्या भारती फराकटे , कला शिक्षक संभाजी भोसले उपस्थित होते . तिला चौंडेश्वरी हायस्कूलचे कलाशिक्षक संभाजी भोसले यांचे मार्गदर्शन तर नामदेव पोवार, पुंडलिक पोवार यांचे प्रोत्साहन लाभले .