तंत्रज्ञानताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोळवण येथील कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती.

गारगोटी :
शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला प्राधान्य देणे गरजेचे आहे. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करूण कमी खर्चात जादा उत्पन्न घेणे काळाची गरज बनली आहे.शेतीविषयक नवीन तंत्रज्ञान व मोबाईल अॅप्सची माहिती कृषी महाविद्यालय राजमाची (कराड) येथील सातव्या सत्रातील कृषीकन्या त्रृतूजा पांडूरंग पाटील हिने तनांच्या व्यवस्थापनाचे प्रात्यक्षिक दाखिवले व मार्गदर्शन केले.
या वेळी शेती आधारीत प्रात्यक्षिके, जमीन व्यवस्थापन.पीक उत्पादन.माती परिक्षण नमुना कसा घ्यावा.तननियंत्रणाच्या वेगवेगळ्या पध्दतींची व जीवामृत तसेच पंचगाव्य कसे बनवावे याची माहिती प्रात्यक्षिकांसह दिली. या तिला मोकाशी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.शिंदे.प्रा.माने.प्रा.बागल यांचे मार्गदर्शन लाभले या वेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.