ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात कृषी ग्राहकांचा मेळावा उत्साहात

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगुड (ता.कागल) येथे महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात कृषी ग्राहकांचा मेळावा उत्साहात पार पडला.

कृषी धोरण २०२० अंतर्गत शेती पंप ग्राहकांना या योजनेचा जास्तीत जास्त लाभ व्हावा यासाठी महावितरणने या ग्राहक मेळाव्याचे आयोजन केले होते. मेळाव्याचे नियोजन उपविभाग प्रमुख हेमंत येडगे, उपकार्यकारी अभियंता यांनी केले.

सदर मेळाव्यास ३०० पेक्षा जास्त कृषी पंप ग्राहक शेतकऱ्यांनी उपस्थित राहून माहिती घेत चर्चेत सहभाग घेतला. सदर मेळाव्यात बिल दुरुस्ती पासून तांत्रिक अडचणी सांगत शेतकऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सर्व प्रश्नांना
उपविभाग प्रमुख हेमंत येडगे यांनी अतिशय सकारात्मक उत्तर दिल्याने सर्व ग्राहक समाधानी होऊन त्यांनी आपल्या प्रश्नांबाबत शांततेने मांडणी केली. बिलाबाबत उपस्थित प्रश्नांमध्ये ९२ ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या. उर्वरित ग्राहकांच्या स्थळ तपासणीनंतर तक्रारी निवारण करणे बाबत ग्राहकांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या.

तसेच सदर मेळाव्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अँड. दयानंद पाटील यासह विविध गावातील सरपंच, पदाधिकारी असंख्य शेतकरी उपस्थित होते. या प्रसंगी विभागीय कार्यालय कोल्हापूर ग्रामीण २ येथील वरिष्ठ अधिकारी उत्तम लांडगे, उप व्यवस्थापक श्री. विवले यांनीही उपस्थित राहून ग्राहकांशी संवाद साधला.

कृषी धोरण २०२० अंतर्गत ज्या ग्राहकांची जून २०२० ची थकबाकी असेल त्या ग्राहकास त्या थकबाकी वरील विलंब आकार व व्याज पूर्ण माफ करून राहिलेल्या थकबाकीत पन्नास टक्के सूट दिली गेलेली आहे. त्यानंतर सप्टेंबर २०२० ते डिसेंबर २०२ पर्यंतची सर्व चालू बिल ग्राहकाने भरणे आवश्यक आहे. जर ग्राहकाने जून २०२० पर्यंत थकबाकी व आलेली चालू बिले ही मार्च २०२२ च्या अगोदर भरली तर ग्राहकास दिलेले ५० टक्के ची सवलत लागू होईल. सध्या ग्राहकांना दिलेली डिसेंबर २०२१ ची देयके ही ५० टक्के सवलत देऊनच दिलेली आहेत.ग्राहकांनी हे देयक २०२३व २०२४ भरले तर त्यांना ३८ टक्के व २० टक्के अनुक्रमे सवलत मिळेल.

याप्रसंगी अँड. दयानंद पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुरगूड उपविभागातील सर्व बिलिंग कर्मचारी तसेच महेश शेंडे, केतन मोरे, प्रकाश पाटील, अमोल बिराजदार, बिरुदेव मेटकर, नवनाथ डवरी, शिवाजी गावडे, सहायक लेखपाल मिलींद वायचळ, प्रवीण पाटील, सुभाष गोनुगडे बी.टी पाटील, वैभव खोत यासह सदर सर्व शाखा अभियंता, उपविभागातील सहाय्यक अभियंता, उपविभागातील सहाय्यक लेखपाल व सर्व बिलिंग स्टाफ यांच्यासह जनमित्र ही उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks