उत्कृष्ट दर्जाची रासायनिक व सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांना वाजवी दरात पुरवठा करणार :राजे समर्जीतसिंह घाटगे ; कागल च्या शाहू कृषी संघाची 40 वी वार्षिक सभा संपन्न

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील श्री छ.शाहू कृषी सहकारी खरेदी विक्री सोसायटी या संस्थेची घोडदौड प्रगतीपथावर आहे.या संघामार्फत उत्कृष्ट दर्जाचे रासायनिक व सेंद्रिय खते सर्वसामान्य शेतकऱ्यांना व सभासदांना वाजवी दरात पुरवठा करणार असलेचे प्रतिपादन राजे समर्जीतसिंह घाटगे यांनी केले.
ते कागल येथे संघाच्या 40 व्या वार्षिक सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, सभासद, शेतकऱ्यांना चांगली सेवा देणेच्या हेतूने शाहू कारखाण्यामार्फत निर्माण केले जाणारे “शाहू
पोट्याश व सेंद्रिय खते शाहु कृषी संघाच्या शाखेमार्फत वितरित करण्यात येणार आहेत.खत विक्री चे टार्गेट 15 कोटिपर्यंत वाढविण्याचा व त्यासाठी आवश्यक तेथे संघाच्या शाखा वाढविण्याबाबत संचालक मंडळ विचाराधीन आहे.
आपल्या अध्यक्षीय भाषणात संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
यावेळी, राजमाता जिजाऊ महिला संस्थेच्या कार्याध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे यांच्या संकल्पनेतून संघामार्फत सुरू केलेला *कागल बाजार* चांगला चालला असून तो नफ्यात आला आहे.संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने या चांगल्या सुचनेबद्धल सौ. घाटगे यांचा सत्कार करण्यात आला.
विषय पत्रिकेचे वाचन कार्यकारी संचालक समीर नाळे यांनी केले. सर्व विषयास सभासदांनी घोरपडे यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.