कौलव येथील शेतकर्याचे अनोखे प्राणी प्रेमाची सर्वत्र चर्चा

कौलव प्रतिनिधी :
प्रत्येकजण आपल्याला परीने घरातील माणसांवर, वृक्षांवर, व आपल्या जवळच्या व्यक्तीवर प्रेम करत असतो. मात्र कोल्हापुरातल्या राधानगरीमधील कौलव गावात एका शेतकर्याने चक्क श्रावण महिन्याच्या तिसर्या सोमवारी शिवपूजनचे औचित्य साधून वासरास दुधाचा अभिषेक घातला. ज्याच्यामुळे शेतकर्याच्या घरात भरभराट होते, त्या वासराला दुधाचा अभिषेक घालून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे पहिल्यांदाच पाहायला मिळतय त्यामुळे याची चर्चा तालुक्यात सर्वत्र सुरू आहे .
राधानगरी तालुक्यातील कौलव हे कृषी प्रधान व माडीच्या घराच गाव अशी गावची ओळख. गावात शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. याच गावातील कै. गोविंद हरी पाटील यांचे नातू अभिजीत पाटील ( वासराचे मालक) व अभिजितचे चुलते नारायण बळवंत पाटील यांचा कित्येक वर्षे बैल खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे. हेच त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन आहे.
ज्याच्यामुळे घरात भरभराट झाली त्या मुक्या प्राण्यावर किती प्रेम आहे ते अभिजीत यांनी तब्बल २१ लिटर दुधाचा अभिषेक घालून दाखवले आहे. यावेळी गावातील मित्र व शेतकरी उपस्थित होते त्यामुळे या अनोख्या प्राणी प्रेमाची तालुक्यात चर्चा आहे.