चांगल्या कामासाठी सर्वांनी एकत्र यावे – आमदार राजेश पाटील

प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
अडकुर येथे मोफत कॅन्सर तपासणी शिबिर आयोजीत करून रुग्णांची चांगली सोय माजी सभापती बबन देसाई यांनी केली अशा कामासाठी सर्वांनी एकत्र यावे असे मत आमदार राजेश पाटील यांनी शिबिरप्रसंगी बोलताना व्यक्त केले तसेच जनतेची सेवा सदर शिबीराच्या माध्यमातून झाली असून येथील सुपुत्र व महाराष्ट्र राज्य विक्रीकर उपायुक्त विनोद देसाई यांनी या शिबिराच्या माध्यमातून गावाशी नाळ जुळविली असे मत माजी रो ह यो राज्यमंत्री भरमु अण्णा पाटील यांनी व्यक्त केले सर्व मान्यवर,डॉक्टर,आशा यांचे स्वागत कृष्ण गंगा फौंडेशनचे अध्यक्ष आर के देसाई यांनी केले डॉ अर्जुन शिंदे,डॉ दिग्विजय पाटील,डॉ विनायक पाटील,डॉ राधिका जोशी,डॉ हाळदे मॅडम,यांनी तपासणी केली या शिबिर उदघाटनावेळी जी प सदस्य सचिन बल्लाळ,माजी सभापती व सदस्य बबन देसाई ,कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष अभय देसाई,विनोद देसाई महाराष्ट्र राज्य विक्रीकर उपायुक्त,युवा नेते संग्रामदादा अडकुरकर,तालुका कॉंग्रेस अध्यक्ष संभाजीराव देसाई,काँग्रेस पक्ष सचिव सुरेशराव दळवी,श्री रेंगडे,श्रीकांत नेवगे,अभिजित देसाई,चेअरमन मछिद्रनाथ पाटील,खंडेराव देसाई,प्रकाश इंगवले,दत्तात्रय देसाई,प्रवीण गुडवळेकर,डॉ सोमजाळ,अप्पा गिलबिले,रवी नाईक व इतर उपस्थित होते