ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रत्येक महिला ही शिक्षित होऊन सुशिक्षित व संस्कारी झाली पाहिजे : प्रा.डॉ.पूनम रजपूत

गारगोटी प्रतिनिधी :

भारतातील प्रथम स्त्री शिक्षिका व सामाजिक परिवर्तनाच्या लढाईतील वीरांगणा सावित्रीबाई फुले यांची 191 जयंती आज मडिलगे हायस्कूल व श्री समर्थ कनिष्ठ महाविद्यालय, मडिलगे बुद्रुक या प्रशालेमध्ये विविध उपक्रमांनी पार पडली. आज विविधांगी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या समस्त स्त्रियांच्या कर्तुत्वाचा पाया स्त्री शिक्षणाच्या कार्यातून क्रांतीसूर्य जोतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी रचला. सुधारणा कार्यात जोतिबा फुले यांना समर्थ कृतिशील साथ देणाऱ्या सावित्रीबाई फुले म्हणजे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, व्यासंग आणि काळाच्या पुढे पाहणारे द्रष्टेपण होय. या विविधांगी कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्या. डॉ. पूनम रजपूत या होत्या. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक प्रा. डॉ. ए. एम. पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी शालेय आंतरवासिता मार्गदर्शिका सौ. प्रा. डॉ. एम. एन. मोरे ,प्रशालेचे सहाय्यक शिक्षक युवराज शिगावकर, सौ एस.एस. खोत, सौ. व्ही. पी. तिकोडे, एस. बी. ढेंगे,बी.एस. चौगुले, एस.टी. कल्याणकर,बी.डी. सावंत ,शालेय आंतरवासितेचे मुख्याध्यापक कृष्णात कांबळे, उपमुख्याध्यापक अस्मिता पाटील, पर्यवेक्षक ज्योती एकशिंगे व छात्र शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

प्रमुख पाहुणे मनोगतामध्ये प्रा.डॉ. पूनम रजपूत यांनी महिला शिक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी केलेले कष्ट विशद करून सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या मदतीने सामाजिक परिवर्तनाचा लढा कशाप्रकारे यशस्वीरीत्या पूर्ण केला, याचे संक्षिप्त मार्गदर्शन केले. हे मार्गदर्शन करत असताना सावित्रीबाई फुले यांच्या विचारातील शिक्षण आजच्या सावित्री नी कशाप्रकारे आत्मसात करायला पाहिजे याचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या स्त्रियांची परिस्थिती पाहिली तर, आजच्या स्त्रियांनी मुख्य:ता शिक्षित होऊन त्यांनी सुशिक्षित व सुसंस्कारित व्हावे, ही सावित्रीमाई यांच्या स्वप्नातील स्त्री असेल ,असे परखड मत आज त्यांनी याठिकाणी व्यक्त केले व सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या मनोगतामधून अभिवादन केले.

मार्गदर्शक मनोगतामध्ये प्रा. डॉ. मोरे यांनी संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्रशाला मधील विद्यार्थी व विद्यार्थिनीणी केलेल्या मनोगताचे मन:पूर्वक कौतुक केले. हे कौतुक करत असताना आजच्या सावित्रीच्या लेकीनी आपल्या दैनंदिन जीवनात आपण शाश्वत विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून जगत असताना आपण कशाप्रकारे सावित्रीचे विचार आत्मसात केले पाहिजेत याचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले.

आजच्या कार्यक्रमांमध्ये मडिलगे हायस्कूल मधील इयत्ता नववी व इयत्ता सहावी विद्यार्थी व विद्यार्थिनीनीआपली मनोगते मांडली. या मनोगतामध्ये सावित्रीबाई फुले यांचा जीवन वृत्तांत तसेच त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा व महात्मा ज्योतिराव फुले यांचे सावित्रीबाई यांना मिळालेले मार्गदर्शन याची विस्तृतपणे मांडणी त्यांनी आपल्या मनोगतामधून व्यक्त केली.

शालेय आंतरवासिता टप्पा दोन छात्रशिक्षिका ज्योती एकशिंगे व छात्रशिक्षक अनिल वारके यांनी आपल्या मनोगतामध्ये ज्ञानज्योती सावित्रीचे विचार मांडले. त्यांनी सावित्रीचा जीवन वृत्तांत विशद करून त्यांनी केलेले सामाजिक कार्य विद्यार्थ्यांना सांगितले. सामाजिक कार्याबरोबरच सावित्रीबाईंना अपेक्षित असलेल्या मुली आज कोणत्या परिस्थितीमध्ये आहेत, आणि सावित्री ची तत्वे त्याचबरोबर सावित्रीचे शिक्षण वा सावित्रीचे विचार आज सावित्रीच्या मुली आत्मसात करत आहेत का ?याचे संक्षिप्त मार्गदर्शन त्यांनी आज या ठिकाणी केले.

आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारी कला म्हणजे प्रशालेच्या विद्यार्थिनींनी साकारलेल्या भूमिका. सावित्री च्या विचारातील नव भारताच्या विकासातील नऊ स्त्रियांची रूपे धारण करून त्यांनी आज सावित्रीच्या विचारांना आपल्या घोषवाक्यातून अभिवादन केले. हे अभिवादन पाहून विचार मंचावर उपस्थित असणाऱ्या मार्गदर्शक व सर्वांचेच मन भारावून गेले.

शालेय आंतरवासिता उपमुख्याध्यापिका अस्मिता पाटील यांनी ‘मी सावित्री बोलते’ ही एकांकिका सादर करून या एकांकिकेमध्ये सावित्री चा जन्मापासून ते सावित्री च्या शेवटच्या क्षणापर्यंतचे, सावित्रीच्या सर्व तत्वांचे स्पष्टीकरण केले. सावित्री ने केलेला संघर्ष त्याचबरोबर महात्मा फुले यांची लागलेली सावित्रीला अनमोल अशी साथ दर्शवून आजच्या स्त्रियांमध्ये कुठेतरी सावित्री हरवत चालली आहे, याचे वास्तवदर्शी प्रदर्शन उदाहरणांच्या माध्यमातून एकांकीकेमधून करून दिले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये प्रा. डॉ. ए. एम. पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून आजच्या कार्यक्रमांमधील सर्व सहभागाबद्दल केले. जयंती महोत्सव प्रशालेमध्ये का साजरा केला पाहिजे ? प्रबोधनात्मक विचाराची गरज आज भावी पिढीला का आहे ?तसेच सावित्री चे स्त्री शिक्षणामधील योगदान काय होते ? याचे संक्षिप्त स्वरूपात मार्गदर्शन करून सावित्रीच्या विचारातील तत्त्वे पुढील पिढीने आत्मसात करून आपण जीवन जगत असताना आपले एक ध्येय निश्चित ठरवावे व त्या ध्येयावर विराजमान होऊन शाश्वत विकासाच्या अजेंड्यावर अग्रेसर व्हावे, असे परखड मत त्यांनी आज आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले.

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज मडिलगे हायस्कूल, मडिलगे व आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गारगोटी शालेय आंतरवासिता टप्पा 2 यांच्या संयुक्त विद्यमानाने आज मडिलगे हायस्कूल मडिलगे या प्रशालेमध्ये विविध उपक्रमानी पार पडली. या कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमापूजन ,दीपप्रज्वलन व भित्तीपत्रक उदघाटनाद्वारे प्रमुख पाहुणे, मार्गदर्शक व अध्यक्षांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय आंतरवासिता छात्रशिक्षिका अश्विनी मांडे यांनी केले. कार्यक्रम पत्रिका व छायाचित्रीकरण आंतरवासिता छात्रशिक्षक अनिल वारके यांनी केले. या कार्यक्रमासाठी मडिलगे हायस्कूल, मडिलगे चे मुख्याध्यापक, सहाय्यक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शालेय आंतरवासिता च्या मार्गदर्शिका, मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक, छात्र शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र ङ बहुसंख्येने उपस्थित होते. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाची सांगता आंतरवासितेच्या छात्रशिक्षिका दीपाली कांबळे यांनी आभार मानून केली.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks