सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी शुध्दलेखन व सुंदर इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा उत्साहात संपन्न

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय दरवर्षी विविध नवोपक्रमांचे आयोजन करत असते. याही वर्षी महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागामार्फत इंग्रजी शुध्दलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करणेत आली. यामध्ये स्पर्धेच्या अगोदर जाहिरात केली जाते. त्यानंतर सहभाग नोंदविला जातो. नंतर नियोजनाप्रमाणे स्पर्धा घेतली जाते. तज्ज्ञ परिक्षकांद्वारे परिक्षण करून तीन विजेते घोषित केले जातात. विजेत्यांना वार्षिक पारितोषक वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र वितरित करण्यात येते. नेहमीप्रमाणे यावर्षीसुद्धा विजेत्यांमध्ये मुलींचीच सरशी होती. यामध्ये प्रथम क्रमांक कु. राधिका रणजीत देसाई (बी.ए. भाग-३) हिने पटकावला. द्वितीय क्रमांक कु.श्रुतिका सुधाकर जाधव (बी.एस्सी. भाग – १) व तृतीय क्रमांक कु.अनुराधा बाळासो ढोले (बी.ए. भाग – २) यांनी पटकाविला. या सार्धेसाठी इंग्रजी विभागाचे लेफ्टनंट प्रा. विनोदकुमार प्रधान यांनी सर्व कामकाज पाहिले. प्राचार्य, डॉ. अर्जुन कुंभार यांची प्रेरणा लाभली. ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडण्यास सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, तृतीय श्रेणी कर्मचारी श्री. दिलीप गणपती कांबळे व श्री. सुमित जाधव यांचे सहकार्य लाभले.