ताज्या बातम्यामहाराष्ट्र
पनोरीची सम्राज्ञी सुतार हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम

कुडूत्री प्रतिनिधी :
पारिजात संस्था मुंबई, यांचेवतीने मराठी भाषा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या खुल्या जागतिक हस्ताक्षर स्पर्धेत किसनराव मोरे हायस्कूलची विद्यार्थिनी सम्राज्ञी मोहन सुतार,पनोरी (ता.राधानगरी)हिने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेमध्ये दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.सम्राज्ञी इयत्ता नववी इयत्तेत शिकत असून ती लहान पणापासूनच हुशार आहे.वडील मोहन सुतार हे कला व आदर्श शिक्षक असून त्यांचेही हस्ताक्षर उत्कृष्ट आहे. हस्ताक्षराचे मार्गदर्शन तिने आपल्या वडिलांकडून व मोरे हायस्कूलचे सर्व शिक्षक यांचेकडून मिळवले आहे .तिच्या या यशाने परिसरात खूप कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.