निधन वार्ता

किटवाड येथील यल्लूबाई मोरे यांच्या निधनानंतर 12 व्या दिवसानिमित्त कुटूंबीयांच्या भावना.

आई आत्ता कुठे तुझ्या सुखाचे 4 दिवस सुरू झाले होते. आमची आई यलूबाई शंकर मोरे यांचे बुधवारी आठ सप्टेंबर रोजी प्रथम प्रहरी 12.30 वाजता दुःखद निधन झाले .

जाधव घराण्यातील चार भावंडांची लाडकी एकुलती एक बहीण गावातीलच मोरे कुटुंबांमध्ये सुनबाई म्हणून आली. पती शंकर मोरे.

मोरे कुटुंबात सुद्धा चार बहिणींचा एकुलता एक लाडका भाऊ शंकर. चार भाऊ आणि चार ननंद दाची . सर्वांची लाडकी व सर्वांचे लाड पुरविणारी. अशी माझी आई. शेजार धर्म पाळणारी कधीही कुणाचं मन न दुखणारी. सात्विक दैववादी. मनाची खंबीर कोणत्याही कामात तल्लख जिद्द अतोनात कष्ट उपसण्याची तयारी सतत प्रयत्नवादी.

पडीत जमिनीत नंदनवन फुलवणारी. अपार मेहनतिथून काबाडकष्ट करून सर्वांचा संसार फुलविलीस. आम्ही तुझ्या उबदार मायेखाली घरट्यात सुखरूप होतो. आमचे शिक्षण पूर्ण होताच घरट्यातून पिल्लू पडावे त्याप्रमाणे. नोकरीच्या ठिकाणी स्थिर होऊन गेलो.

दोन मुलींच्या लग्नानंतर त्याही आपापल्या संसारात स्थिराहून गेल्या. माणसांच्या पाहुण्यांच्या गोतावळयात राहणारी तू . आता कुठे तू संपूर्ण किटवाड गावची मोरे आई झाली होतीस.

गावच्या विशीतच घर असल्याकारणाने गावातील प्रत्येक मनुष्य बाई लहान पोर मोरे आई आणि मोरेबाबा अशी हाक दिल्यावाचून पुढे जात नव्हते . लहान थोरांशी सर्वांशी हसतमुखानं वागणारी माझे मित्र भाऊ चे मित्र परदेशातून गावी आल्यानंतर हक्काने त्यांच्या नावाने हाक मारून आग्रहाने घरी बोलून चहा देणारी.

अनेक भाचे डॉक्टर इंजिनिअर शिक्षक जरी झाले तर हृदयाच्या आंतरिक प्रेमातून भेटण्यासाठी जाताना चटणी-भाकर घेऊन जाणारी साधी राहणी असणारी माझी आई . स्वतः अनाडी असून दुसऱ्याला शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारी.

मध्यंतरीच्या काळात मोरे कुटुंबावर अरिष्ट कोसळले ते विधीलिखित नसून मानवनिर्मित होते 1869पासून 1990 पर्यंत. बेळगाव गणपत गल्लीतील प्रसिद्ध भांडी व्यापारी मुकुंद तुकोजी पाटील यांच्या घरी मोरे कुटुंब 1869 च्या दरम्यान घरगडी म्हणून राहायला आले . त्यांची संपूर्ण जमीन घर ते पाहत होते. इमानेइतबारे मालकाची चाकरी कशी करावी हे मोरे कुटुंबाकडून शिकावे 1962 च्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी कसेल त्याची जमीन हा कुळ कायदा अमलात आणला त्या कायद्यान्वये संपूर्ण जमीन घर हे मोरे कुटुंबाचे होणार होते.

पण मालकाशी
बेइमानी करणारा आमचा आजोबा नव्हता. मध्यंतरी आजोबांचे अकाली निधन झाले आणि संपूर्ण जबाबदारी वडील शंकर मोरे यांच्यावर आली .

वडिलांनीही आजोबांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता मालकाने ठरवून दिलेला खंड नेमाने बेळगावला पोच करत होता. मात्र 1990 च्या दशकात गावातील चार कुटुंबानी .1869 पासून . 3 पड्या माझे आई व वडील कसत असलेली जमीन आमच्या कडून काढून घ्यायला मूळ जमीन मालकाला भाग पाडले त्यावेळी आम्ही चार भावंडे लहान होतो . या विश्वासघाताने माझे वडील खूप खचून गेले. त्यावेळी विश्वासांने वडिलांना आधार दिलीस. आणि सांगितलीस . या लोकांनी आमचेकडे जमीन काढून घेतली आमचे नशीब आणि आमचे कष्ट तरी त्याना काढून घेता येणार नाहीत खुरप्याच्या मुठीवर माझा विश्वास आहे माझ्या लेकरांना मी काबाडकष्ट करून शिकवीन त्यांना मोठं करीन तीच आमची शेती समजू असा विश्वास असणारी तु आणाची आई. पत्री पन्ना च्या डोंगरातील पळसाची पाने विकून गवत विकून तू आमच्या शिक्षण पूर्ण केलीस. देवानं दिलेलं सरणार नाही आणि माणसांना दिलेलं पुरणार नाही असा गाड विश्वास असणारी तू.

मुलाच्या शिक्षणाचा खर्च पेलवत नाही असं तुझ्या लक्षात आलं तेव्हा कोवाड मधील गोकुळ स्वीट मार्ट चे मालक महादेव हेबाळकर यांच्या दुकानात तू मला कामाला पाठवलास आणि तिथे माझ्या शिक्षणाची सोय केलीस.

माणसातील या महादेवाने माझे दहावीनंतरचे शिक्षण पूर्ण करून डीएड करून मला बेळगावात शिक्षक म्हणून नोकरीला लावलं . एका मुलाला मेकॅनिकल इंजिनिअर करून पुण्याला पाठवलीस.

दोन सुना नातवंडे यांच्यामध्ये सुखाने आनंदाने जीवन जगण्याचे दिवस आले असतात नियातीला हे मान्य नव्हते . आणि म्हणून तू आम्हाला पोरके करून निघून गेलीस.
तुझ्या अकाली जाण्याने आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून आम्हाला सावरण्यासाठी मित्र परिवार आणि पाहुणे गावकरी मंडळी आणि जो मला आधार दिला त्यांचा मी ऋणी आहे गेले बारा दिवस तुझी आठवण येत नाही असा एकही क्षण जात नाही डोळ्याची पापणी मिटताच तुझी सोज्वळ शांत जिद्दी कष्टाळू मूर्ती डोळ्यासमोर येते.

तू घालून दिलेल्या मार्गावर ती मार्गस्थ होताना नक्कीच आम्ही आदर्श जीवन जगू
तुझाच कुटुंब परिवार
‘श्री तारा यश’

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks