ताज्या बातम्याभारतराजकीय

Election Result 2022 : उत्तर प्रदेशमध्ये भाजप ठरला सर्वात मोठा पक्ष, सपाची शतकी खेळी

लखनौः 

साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीच्या निकालाचे (UP Assembly Election Result 2022) कल हाती आले असून, सध्या तरी भाजपने मुसंडी मारल्याचे दिसून येत आहे. भाजप तब्बल दोनशे पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे. तर समाजवादी पक्षाने (SP) आतापर्यंत शतकी खेळी केल्याचे समोर येतेय. उत्तर प्रदेशमध्ये भाजपने (BJP) योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवली. भाजपसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील प्रचारात उपस्थिती लावली. दुसरीकडे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या नेतृत्त्वात समाजवादी पक्ष (SP) आणि आरएलडीने निवडणूक लढवली आहे.

 

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks