प्रहार जनशक्ती पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रवक्ता पदी संदीप सरदेसाई यांची निवड.
कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष रमेश आरेकर पाटील यांच्या उपस्थितीत संदीप सरदेसाई यांच्या सामजिक कार्याची दखल घेवून कोल्हापूर 'जिल्हा प्रवक्ता' पदी त्यांची निवड करण्यात आली.

कोल्हापूर :
प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी राज्यमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष अखंड महाराष्ट्रभर कार्यरत आहे. भाऊंनी दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, कामगार, निराधार यांच्या प्रश्नाला हात घालून त्यांना न्याय देण्याचे काम या पक्षाच्या माध्यमातून केलेले आहे. हे विचार, राजकीय व सामजिक प्रश्न तसेच पक्षाची ध्येय आणि धोरणे मांडण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष रमेश आरेकर पाटील यांच्या उपस्थितीत संदीप सरदेसाई यांच्या सामजिक कार्याची दखल घेवून कोल्हापूर ‘जिल्हा प्रवक्ता’ पदी त्यांची निवड करण्यात आली.
यावेळी उपस्थित कोल्हापूर जिल्ह्याची नवकार्यकारीनी कोल्हापूर जिल्हा संघटक – अमित इंदुलकर, जिल्हा संपर्कप्रमुख – आनंदराव काशीद, जिल्हा सरचिटणीस – प्रकाश कीरवेकर, जिल्हा युवा अध्यक्ष – मयूर वरुटे, जिल्हा युवा उपाध्यक्ष – ओमकार पाटील, शहराध्यक्ष- आशिष शिंदे , शहर उपाध्यक्ष – नरेन उबाळे, शहर सचिव – उत्तम कुऱ्हाडे, करवीर तालुकाध्यक्ष (दक्षिण) – पै. कैलास पाटील, करवीर तालुकाध्यक्ष (उत्तर) – आदित्य कांबळे, पन्हाळा तालुका अध्यक्ष – कृष्णात जमदाडे, पन्हाळा तालुका उपाध्यक्ष- पद्मदीप पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष- संजय मेहतर, भुदरगड तालुका अध्यक्ष – मच्छिंद्र मुगडे, भुदरगड तालुका उपाध्यक्ष – प्रतीक पाटील, व उपस्थित पदाधिकारी संदीप मोहिते-पाटील, सागर कांबळे, गीताताई हसुरकर, माधुरी म्हेत्रे, स्नेहल कारेकर, रामेश्वरी पारखे, अश्विनी पाटील, विकास चौगुले, सुनील शिंदे, दादासो सुतार, विनोद शेवाळे, प्रल्हाद माने, नासिर नदाफ, सतीश पाखले, शहाबुद्दीन घुडूभाई, प्रशांत बेडगे व विकास गायकवाड इत्यादी उपस्थित होते. सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम जिल्हा प्रहार कार्यालय कोल्हापूर येथे संपन्न झाला.