ताज्या बातम्या
महाराष्ट्र राज्य वनमजूर संघर्ष कृती समितीच्या उपाध्यक्ष पदी धनाजी गुरव यांची निवड.

अमरावती :
महाराष्ट्र राज्य वनमजूर संघर्ष कृती समितीच्या उपाध्यक्ष पदी कोल्हापूर मधून धनाजी गुरव यांची निवड अमरावती येथे झालेल्या सभेमध्ये करण्यात आली. सोबत समितीच्या अध्यक्षपदी नाशिक मधून भाऊसाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी श्रीकृष्ण माहोरे हे होते. सूत्रसंचालन व्ही. टी. लोणकर यांनी केले.