ताज्या बातम्या
नागरदळे येथील वृद्ध बेपत्ता.

चंदगड प्रतिनिधी :
नागरदळे येथील जोतिबा भावकू वांद्रे (वय 75 वर्षे) हे बेपत्ता आहेत. ते! रविवार (दि. 12 सप्टेंबर) रोजी सकाळी 7 वाजता घरातून बाहेर पडले आहेत. अंगामध्ये स्वेटर, त्यावर हिरव्या रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची पँट आणि सोबत रंगेबीरंगी टॉवेल आहे. सोबत एक गोणीही आहे. हतामध्ये काठी घेऊन ते घरातून गेले होते.
शेताकडे जातो म्हणून 12 तारखेला गेल्यानंतर अद्याप ते घरी परतले नाहीत. घरच्यांसह नातेवाईकांनी शोधमोहिम सुरु केली आहे. कोवाड, तसेच चंदगड पोलीस ठाण्यात रितसर तक्रार नोंदवली आहे. मात्र, आपल्या नजरेस असे कोणी सापडल्यास कृपया खालील क्रमांकावर कळवा.
संपर्क क्रमांक –
विजय वांद्रे – 7507346682
संजय वांद्रे – 8976867224